शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सांगलीत मोडी लिपीतील राज्यातील पहिली भित्तीपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 15:25 IST

सांगली येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी शिवजयंतीनिमित मोडी लिपीत संपूर्ण शिवचरित्र लिहीले आहे. मोडी लिपीतील भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम करण्यात आला आहे. मोडी लिपीत भित्तीपत्रिका करणारे गरवारे महाविद्यालय राज्यातील पहिले महाविद्यालय आहे.

ठळक मुद्देसांगलीत मोडी लिपीतील राज्यातील पहिली भित्तीपत्रिकामोडी लिपीत संपूर्ण शिवचरित्र

सांगली : येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी शिवजयंतीनिमित मोडी लिपीत संपूर्ण शिवचरित्र लिहीले आहे. मोडी लिपीतील भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम करण्यात आला आहे. मोडी लिपीत भित्तीपत्रिका करणारे गरवारे महाविद्यालय राज्यातील पहिले महाविद्यालय आहे.प्रत्येक महाविद्यालयात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या विषयांची भित्तीपत्रिका केली जाते. गरवारे महाविद्यालयात मात्र, इतिहास विभागाच्या वतीने मोडी लिपीतील भित्तीपत्रिका करण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून उलगडून दाखविण्यात आला.

प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभागाच्या प्रा. उर्मिला क्षीरसागर आणि मोडीतज्ञ मानसिंगराव कुमठेकर यांनी या उपक्रमाचे संयोजन केले. विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध पैलूंची माहिती सांगणारे लेख मोडी लिपीतून लिहिले.

शिवाजी महाराजांचे शेती विषयक धोरण, आरमार, विविध किल्ले, त्यांचे धार्मिक धोरण, शिवकालीन अर्थकारण, शिवकालीन खेळ अशा विविध विषयावर मोडी लिपीत लेख लिहून ते आकर्षकरित्या मांडण्यात आले. या भित्तीपत्रिकेला 'शिवस्मरण' असे समर्पक नावही देण्यात आले.

मोडी लिपी शिक्षक मानसिंगराव कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपना निंबाळकर, प्राजक्ता जाधव, स्वाती घोडके, संस्कृती पाटील, धनश्री चौगुले, अश्विनी पवार, प्रज्ञा सपकाळ, लीना पाटील, प्रतिक्षा पाटील, पद्मजा मिरजकर, वैष्णवी होनराव, फिजा शेख, स्मितल वाघमोडे, सुवर्णा मराठे, शोभा संचेती, स्वरा मराठे, तेजस्वी कांबळे, प्रतिक्षा कांबळे, अमृता कोळी, सौ. दीपाली माने, सुचित्रा गोलंगडे, सोनम मडके यांनी हे मोडी लिपीतील लेख लिहले.भित्तीपत्रिकेच्या उद्घाटनावेळी विद्यार्थिनींनी रांगोळी रेखाटली तीही मोडी लिपीतील अक्षरांचीच. विद्यार्थिनींनी मोडी लिपीतून केलेलं हे 'शिवस्मरण' छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना देणारे ठरले.या भित्तीपत्रकाच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी, प्रा. उर्मिला क्षीरसागर, प्रा. आर. जी. देशपांडे, प्रा. एन. जी. काळे, प्रा. लीना पाटील, प्रा. आर. बी. पाटील उपस्थित होते.

टॅग्स :historyइतिहासartकलाSangliसांगली