शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
4
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
5
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
6
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
7
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
8
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
9
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
10
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
11
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
12
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
13
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
14
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
15
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
16
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
17
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
18
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
19
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
20
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

डांगे महाविद्यालयात देशातीलपहिले मोटार प्रशिक्षण केंद्र

By admin | Updated: November 6, 2015 23:38 IST

शेखर गायकवाड : प्रशासनाचा प्रयोग; आज उद्घाटन

सांगली : जिल्हा प्रशासन व आरटीओ यांच्या संयुक्त विद्यमाने आष्टा (ता. वाळवा) येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात मोटार प्रशिक्षण केंद्र सुरु केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर गायकवाड व आरटीओ दशरथ वाघुले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. देशातील हा पहिला प्रयोग असून, प्रशिक्षण केंद्राचे शनिवारी सकाळी अकरा वाजता उद्घाटन केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.ते म्हणाले, वाहनांची संख्या जशी वाढत आहे, तशी अपघातांची संख्याही वाढत आहे. १८ ते ३५ वयोगटातील तरुण अपघातात मृत्युमुखी पडत आहेत. महाविद्यालयात असतानाच विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती, वाहन कसे चालवावे, याची माहिती मिळावी, यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयात हा उपक्रम राबविण्याची संकल्पना चर्चेतून पुढे आली होती. अ‍ॅटोमोबाईल अभियांत्रिकी महाविद्यालयात हा उपक्रम राबविला, तर तो परिणामकारक ठरणार आहे. यासाठी डांगे महाविद्यालयाची निवड केली. संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे व सचिव अ‍ॅड. चिमण डांगे यांच्यासमोर ही संकल्पना मांडण्यात आली. त्यांनीही लगेच होकार दिला. त्यानुसार देशातील पहिले मोटार प्रशिक्षण केंद्र डांगे महाविद्यालयात सुरु होत आहे.ते म्हणाले महाविद्यालयातील प्रयोगशाळेत मोटार प्रशिक्षणासाठी लागणारी यंत्रसामग्री, अवजारे व भित्तीचित्रे आणि प्रशिक्षकांची उपलब्धता असते. त्यामुळे प्रशिक्षण केंद्रात फारशी अडचण भासणार नाही. डांगे यांच्यासमोर संकल्पना मांडल्यानंतर त्यांनी केवळ २५ दिवसात सर्व तयारी पूर्ण केली. प्रशिक्षणासाठी दोन वाहने खरेदी केली. वाहन चालविण्याचा सराव करण्यासाठी नवीन सिम्युलेटर यंत्र बसविले आहे. तीस दिवसांचे हे प्रशिक्षण असणार आहे. विशेषत: मुलींनाही याचा फायदा होणार आहे. डांगे महाविद्यालयात शनिवारी सकाळी अकरा वाजता होणाऱ्या प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनास कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा, जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे आदी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)लाखो विद्यार्थ्यांना फायदादशरथ वाघुले म्हणाले, राज्यात ३६६ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. यामध्ये बारा लाखाहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात हा उपक्रम सुरु झाला, तर लाखो विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, वाहन कसे चालवावे, याचे प्रशिक्षण मिळेल. महाविद्यालयीन जीवनातच याचे धडे मिळाल्याने, अपघाताला आळा बसेल. तसेच या विद्यार्थ्यांनी समाजातील चार लोकांचे प्रबोधन केले, तर फार मोठी क्रांती घडू शकते.