शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

सांगली जिल्ह्यात महिलांनी चालविले पहिले चारा दान केंद्र -: आटपाडी तालुक्यातील जांभुळणी येथे सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 14:17 IST

दाट होत चाललेले दुष्काळाचे ढग...पाणी, चाऱ्याविना डोळ्यातून बरसणाऱ्या धारा अशा वातावरणात ओढावलेल्या नैसर्गिक संकटाशी सामना करीत असलेल्या लाखो दुष्काळग्रस्तांचे लक्ष आटपाडी तालुक्यातील जांभुळणी येथील चारा दान केंद्राने वेधले आहे. चार व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, स्वछता व्यवस्थापन, जमा खर्चाचे नियोजन अशा सर्व गोष्टी महिलांच्या हाती आहेत

ठळक मुद्देतिनशेहून अधिक जनावरांची देखभाल, महिलांच्या हाती जनावरांच्या पालनपोषणाची दोर

सांगली : दाट होत चाललेले दुष्काळाचे ढग...पाणी, चाऱ्याविना डोळ्यातून बरसणाऱ्या धारा अशा वातावरणात ओढावलेल्या नैसर्गिक संकटाशी सामना करीत असलेल्या लाखो दुष्काळग्रस्तांचे लक्ष आटपाडी तालुक्यातील जांभुळणी येथील चारा दान केंद्राने वेधले आहे. चार व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, स्वछता व्यवस्थापन, जमा खर्चाचे नियोजन अशा सर्व गोष्टी महिलांच्या हाती आहेत. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने चाललेल्या घुटुगडे वस्तीवरील या केंद्राने तिनशेहून अधिक जनावरांचे पालनपोषण सुरू केले आहे. 

जांभुळणी येथे उगम व बळीराजा फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दि ६ मे २0१९ रोजी  'पुण्यकर्म' चारा दान केंद्र सुरू झाले. जनावरांच्या मालकांच्या नावाने तीनशेच्या आसपास जनावरांची भरती झाली. प्रत्यक्ष चारा वाटप सुरू झाले. मालकाचे नाव पुकारल्याबरोबर प्रत्येक वेळी कोणीतरी महिला पुढे येऊन चारा घेऊन जात होती. कुटुंबप्रमुख म्हणून नाव पुरुषाचे आणि चारा न्यायला येते त्या घरातली स्त्री. हे चित्र येथील सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. संदेश पवार यांनी अनुभवले. सर्वच्या सर्व जनावरांचे मालक त्या घरचे पुरुष आहेत आणि इथे जनावरांचे पालनपोषण व काळजी घरची महिला करीत आहे. वास्तविक ग्रामीण भागात घर संभाळण्याबरोबरच घरातील पशुधन सांभाळण्याचा ताण महिलांवरच असतो. जांभुळणीतल्या चारा छत्रात डोंगर-दऱ्यातून चार पाच किलोमीटर पायपीट करून दररोज जनावरांना महिलाच घेऊन येत होत्या. त्यांना प्रचंड त्रास सोसावा लागतोय हे लक्षात येताच या महिलांना जवळ सोयीचे पडेल असे घुटुगडे वस्ती वरचे दुसरे ठिकाण पवार यांनी निवडले आणि त्या ठिकाणी दुसरे चारा छत्र फक्त महिलांनी पुढाकार घेऊन सुरू केले.

या चारा छत्रात जनावरांची नोंद संबंधित महिलेच्या नावावरच घेतली गेली आहे. या केंद्रात चारा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, स्वछता व्यवस्थापन, जमा खर्च आदी सर्व जबाबदाऱ्या केवळ महिला सांभाळत आहेत. या ठिकाणी जवळजवळ ८0  ते १00 जनावरे चारा खाण्यासाठी दररोज दाखल होत असून चारा छत्राचे नियोजन स्थानिक महिला चोखपणे करत आहेत. या चारा केंद्रासाठी दररोज पाच हजार लिटर पाणी पुरवण्याची महत्वपूर्ण जबाबदारी वैशाली दत्तू मुढे यांनी घेतलेली असून जनाबाई एकनाथ घुटुगडे यांनी चारा व्यवस्थापन, मंगल पांडुरंग जुगदर यांनी स्वछता, ताई दत्तात्रय घुटूगडे यांनी जमा-खर्च, हिराबाई दादा घुटुगडे यांनी देखरेख,.वैशाली शहाजी घुटुगडे, सुवर्ण प्रकाश तरंगे यांनी मदतगार म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. महिलांच्या कर्तबगारीचे कौतुकच!याविषयी संदेश पवार म्हणाले की, अस्मानी संकटात खंबीरपणे संसार वाचवणाºया महिलांच्या कर्तबगारीचे कौतुक व्हावे, त्यांच्या धडपडीचा सन्मान व्हावा यासाठी सुवर्णा खंडेलवाल-जोशी यांच्या प्रेरणेतून व भाई संपतराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभिनव चारा छत्र यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. संवेदनशील लोकांनी यासाठी साठी साथ द्यावी. थोर महिलांचे स्मरणविशेष म्हणजे या ठिकाणच्या निवाऱ्यांना राजमाता जिजाऊ,  सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, कल्पना चावला यासारख्या थोर महिलांची नावे दिली आहे. त्यांच्या कार्याचा सचित्र सन्मान यानिमित्ताने करण्यात आला आहे. त्यामुळे हे केंद्र अधिक लक्षवेधी ठरले आहे.

 

टॅग्स :SangliसांगलीLadies Special Serialलेडीज स्पेशल