शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली विधानसभा मतदारसंघात 22 सप्टेंबरला पहिली चुनाव पाठशाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 14:12 IST

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदान जनजागृती करण्यासाठी व मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी चुनाव पाठशालाचे आयोजन करण्याच्या सूचना आहेत.

सांगली : निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदान जनजागृती करण्यासाठी व मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी चुनाव पाठशालाचे आयोजन करण्याच्या सूचना आहेत.

सांगली विधानसभा मतदारसंघात सर्व मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी चुनाव पाठशालांचे रविवार, दिनांक 22 सप्टेंबर, दुसरी चुनाव पाठशाला बुधवार, दिनांक 2 ऑक्टोबर व तिसरी चुनाव पाठशाला रविवार, दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत आयोजन करावे, अशा सूचना मतदान नोंदणी अधिकारी, सांगली विधानसभा मतदारसंघा तथा निवडणूक निर्णय अधिकारी-सांगली वसुंधरा बारवे यांनी दिल्या आहेत.सर्व बीएलओनी केंद्रांमध्ये सर्व नवमतदार, दिव्यांग मतदार, सीनियर सिटीजन, निवृत्त शासकीय कर्मचारी/अधिकारी, 14 ते 17 वयोगटातील सर्व तरुण, 14 वर्षापर्यंतची मुले जी शाळेला जात नाहीत, आणि सर्व महिला या सर्वांना या चुनाव पाठशाला साठी आमंत्रित करावे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी शाळेतील मुलांमार्फत सर्व पालकांना चुनाव पाठशाला करिता उपस्थित राहण्याबाबत आमंत्रित करावे, असेही त्यांनी सूचित केले आहे.चुनाव पाठशाळेत मतदार याद्यांचे सर्वासमोर वाचन करण्यात यावे, व मतदान प्रक्रिया बाबत माहिती देऊन शंकासमाधान करावे. तरुण मुलांना जे नवमतदार आहेत त्यांना मतदान करणे बाबत प्रेरित करण्यात यावे. मतदारांना ऑनलाइन मतदार यादीत स्वतःचे नाव शोधण्यासाठी ceo.maharashtra.gov.in पपोर्टल वर तसेच ऑनलाइन या वेबसाईटवर जाऊन शोधणे बाबत मार्गदर्शन करावे.

नवीन मतदारांना मतदार यादी मध्ये नाव नोंदविण्यासाठी nvsp.in या संकेतस्थळावर जाऊन मतदार यादीत नाव कसे नोंदवायचे याबाबत मार्गदर्शन करावे. सर्व केंद्रस्तरीय अधिकारी यांनी चुनाव पाठशालेच्या दिवशी मतदान केंद्रावर थांबावे.ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्व मतदारांनी मतदान करावे व आपल्या परिसरातील लोकांनीही मतदान करण्यास प्रोत्साहित करावे याबाबत सर्वांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली