शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पहिली अंध वारकऱ्यांची पायी दिंडी; मिरजेतून पंढरपूरला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 21:21 IST

आम्ही स्पर्शाने व अंतर्मनाने विठ्ठलाचे दर्शन घेणार असल्याचे दिंडीत सहभागी अंध वारकºयांनी सांगितले. दिंडीत मिरजेतील दावल शेख यांच्यासह सहा मुस्लिम अंध वारकरी सहभागी आहेत. दिंडीचे पूजन आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.

ठळक मुद्दे: राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याहस्ते पूजन

मिरज : कार्तिक एकादशीसाठी राज्यातील पहिली अंध वारकऱ्यांची पायी दिंडी मिरजेतून पंढरपूरला रवाना झाली. शिरोळचे आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याहस्ते या दिंडीचे पूजन करण्यात आले.

राज्यातून लाखो भाविक कार्तिक एकादशीसाठी पंढरपूरला पायी दिंडीने विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. लांबवर पायी प्रवास करून पंढरपुरात पोहोचलेल्या अनेक वारक-यांना दिवसभर रांगेत उभे राहूनही विठ्ठलाचे दर्शन मिळत नाही. मात्र विठ्ठलाच्या पंढरीत पोहोचल्याचे समाधान मिळते. पंढरपूरपर्यंत शेकडो किलोमीटर लांबचा पायी प्रवास करूनही, आपल्याला मंदिराच्या गाभा-यातूनही विठ्ठलाचे दर्शन यादृष्टीने घेता येणार नाही याची माहिती असतानाही, त्याच जोशाने पायी दिंडीतून विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन राज्यातील पहिली अंध वारक-यांची दिंडी मिरजेतून कार्तिक एकादशीसाठी पंढरपूरला रवाना झाली.

आम्ही स्पर्शाने व अंतर्मनाने विठ्ठलाचे दर्शन घेणार असल्याचे दिंडीत सहभागी अंध वारक-यांनी सांगितले.दिंडीत मिरजेतील दावल शेख यांच्यासह सहा मुस्लिम अंध वारकरी सहभागी आहेत. दिंडीचे पूजन आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले. मिरजेतील स्वरगंधार सांस्कृतिक मंच व सर्वधर्मसमभाव अपंग सेवा संस्थेचे प्रवीण पाखरे, यशवंत जाधव, दावल शेख यांनी दिंडीचे नियोजन केले आहे.

राज्यातील सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे व विदर्भातून आलेले ३५ अंध वारकरी दिंडीत सहभागी आहेत.मिरजेतील गर्डर विठ्ठल मंदिरातून या दिंडीला प्रारंभ झाला. यावेळी टाळ-मृदंगाच्या तालावर अंध वारकरी विठ्ठलाची स्तुती गात नाचत होते. ९ नोव्हेंबर रोजी कार्तिक एकादशीला हे सर्वजण पंढरपुरात पोहोचणार आहेत. दिंडीसोबत राहुल सोमशेट्टी, मिलिंद कुलकर्णी, ओंकार जाधव, गणेश जगदाळे हे स्वयंसेवक दिंडीला पंढरीचा मार्ग दाखविणार आहेत.

राज्यातून अनेक पायी दिंड्या निघतात. मात्र अंधांची दिंडी प्रथमच अत्यंत भक्तिभावाने पायी पंढरपूरला जात आहे. मिरजेतील नामदेव मंदिर येथून नागरिकांनी अंध वारक-यांना शुभेच्छा दिल्या.

 

टॅग्स :Sangliसांगली