शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांच्या शेडला आग, जातिवंत बैलासह इतर जनावरे मृत्युमुखी, एक क्षणात सर्व काही संपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 14:13 IST

Fire Framer Sangli- जनावरांच्या शेडला आग लागली आणि दोन जातिवंत बैलासह इतर जनावरे आगीत मृत्युमुखी पडले आणि एक क्षणात सर्व काही संपले, पूर्ण संसार उध्वस्त झाला. 

ठळक मुद्दे जनावरांच्या शेडला आग, जातिवंत बैलासह इतर जनावरे मृत्युमुखीएक क्षणात सर्व काही संपले

विकास शहाशिराळा  : येथील औढी रस्त्यावरील पाडळी हद्दीत यादव मळ्यातील तात्यासाहेब भांडवले यांच्या जनावरांच्या शेडला आग लागली आणि दोन जातिवंत बैलासह इतर जनावरे आगीत मृत्युमुखी पडले आणि एक क्षणात सर्व काही संपले, पूर्ण संसार उध्वस्त झाला. 

ज्याच्या शेतात काम करतात त्यांच्या शेताजवळ  तात्यासाहेब भांडवले यांनी जनावरांच्यासाठी मंडपवजा गोठा केला होता. या गोठ्यास सोमवार दि. ५ रोजी रात्री आग लागली.  या आगीत दोन जातिवंत बैल , दोन म्हैशी , एक वासरू , एक रेडकू अशी सहा जनावरे पाच शेळ्या, ६० ते ६५ कोंबड्या, मृत्युमुखी पडले. जनावरांचे शेड , पिंजर, शेती औजारे, सेन्टरिंगचे साहित्य, संसाराची भांडी सर्व काही जळून नऊ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले.

रात्री ८ च्या दरम्यान आग लागली असून आग विझविणाचे प्रयत्न सुरू होते. ही आग रात्री १ च्या दरम्यान विझली. आसपासच्या गावातील पाण्याच्या टाक्या आदीने ही आग विझवण्यात आली, मात्र तोपर्यंत सर्व काही संपले होते.या आगीत एक गाभण म्हैस तसेच तात्यासाहेब ज्या बैलांच्यावर आपला जीव ओवाळून टाकत होते, तसेच अनेक शर्यतीत बक्षिसे मिळून देत होते त्या सुगर व सायब्या या बैलांचा जीव गेला. यावेळी शेकडो नागरिक, तलाठी शंभू कन्हेरे , पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए. वाय. थोरात यांनी सहकार्य केले. हे कुटुंब उद्धवस्त झालेले पाहून त्याच ठिकाणी नागरिकांनी आर्थिक मदत गोळा करण्यास सुरुवात केली. आणखी मदत मिळावी यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

डोळ्यादेखत आगीमध्ये मृत्युमुखी पडली आवडती बैलजोडी

एक गुंठा जमीन नाही, दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून तात्यासाहेब भांडवले यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. तात्यासाहेब भांडवले यांना बैलगाडीच्या शर्यतीचा नाद आहे, या शर्यतीसाठी आणलेली सुगर व सायब्या ही जातिवंत आवडती बैलजोडी आणि जनावरे त्यांच्या डोळ्यादेखत आगीमध्ये मृत्युमुखी पडली, या बैलांच्यावर ते आपला जीव ओवाळून टाकत. प्रसंगी एक वेळ उपाशी राहिले होते. आणि आपण काहीही करू शकलो नाही याचे त्यांना मोठे दुःख आहे. 

माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी दिली घटनास्थळी भेट माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक , रणजितसिंह नाईक , सुखदेव पाटील , उत्तम डांगे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी जळीतग्रस्त शेतकरी तात्यासाहेब भांडवले, पोपट गायकवाड, विलास यादव, माणिक कदम ,महेश खबाले,राजेंद्र नलवडे,विकास शहा ,दिनेश हासबनिस, सुभाष नलवडे, हरिभाऊ कवठेकर, रामचंद्र पाटील यांचेसह शेतकरी, ग्रामस्थ व अधिकारी आदी उपस्थित होते.

बैल विकले नाहीतया आगीतून एक रेडकू गोठ्याच्या दरवाज्यात होते, त्याचे दावे तात्यासाहेब यांच्या आईने कापून काढले त्यामुळे त्याचा प्राण वाचला. त्यास किरकोळ भाजले आहे., दोनच दिवसांपूर्वी सुगर व साहिब्याला पाच लाख रुपयेने विकत घेण्यास काहीजण आले होते मात्र तात्यासाहेब याने हे बैल विकले नाहीत.

टॅग्स :fireआगshirala-acशिराळाSangliसांगली