शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षतोडप्रकरणी गुन्हा दाखल -आयुक्तांची माहिती : आमराई वृक्षतोड प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 23:54 IST

आमराई उद्यानातील बेकायदा वृक्षतोडप्रकरणी महापालिकेने कंत्राटदार सिद्ध रेड्डी याच्याविरूद्ध सांगली शहर पोलिसांसह न्यायालयातही गुन्हा दाखल केल्याची माहिती आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी गुरुवारी

ठळक मुद्देसांगली महापालिकेच्या कामगारांनाही नोटिसा

सांगली : आमराई उद्यानातील बेकायदा वृक्षतोडप्रकरणी महापालिकेने कंत्राटदार सिद्ध रेड्डी याच्याविरूद्ध सांगली शहर पोलिसांसह न्यायालयातही गुन्हा दाखल केल्याची माहिती आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली. उद्यान विभागाकडील कर्मचाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटिसा बजाविल्या असून त्यांचे म्हणणे आल्यानंतर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.गेल्या आठवड्यात आमराई उद्यानात आॅफिसर्स क्लबच्या टेनिस कोर्टवर पालापाचोळा पडतो, म्हणून वृक्षतोड करण्यात आली.

या वृक्षतोडीवरून शहरात मोठा गदारोळ उडाला. राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात, सागर घोडके, मयूर घोडके यांनी आमराईतच ठिय्या मारत कारवाईची मागणी केली. त्यानंतर सामाजिक संघटना व निसर्गप्रेमींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. या प्रकरणात आॅफिसर्स क्लबचे सदस्य असलेले वरिष्ठ अधिकारी, मोठ्या ठेकेदारांवर संशय व्यक्त होत होता. त्यामुळे हे प्रकरण दडपण्यात आल्याची चर्चा होती.

वृक्षतोडीबाबत आयुक्त खेबूडकर म्हणाले की, वृक्षतोडप्रकरणी आॅफिसर्स क्लबचे क्रीडा अधिकारी पै, कामत व झाडे तोडणारा ठेकेदार यांचे जबाब घेण्यात आले आहेत. ठेकेदाराला दूरध्वनी करून झाडे तोडण्यास सांगितले. वास्तविक महापालिकेने अथवा वृक्ष समितीने परवानगी दिली नसतानाही ही झाडे तोडली गेली. झाडे तोडण्याचे कंत्राट दिलेल्या रेड्डी याला फांद्या तोडण्यास सांगितले होते. पण त्याने काही झाडे बुंध्यापर्यंत तोडली. या झाडांना कीड लागल्याने ती बुंध्यापर्यंत तोडल्याचे त्याने जबाबात सांगितले आहे. महापालिकेने कंत्राटदार रेड्डी याच्याविरूद्ध शहर पोलीस व जिल्हा न्यायालयात गुन्हा दाखल केला आहे.

उद्यान विभागाकडील कर्मचाºयांनाही कारणे दाखवा नोटिसा बजाविल्या आहेत. त्यांचे म्हणणे आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. २७ जानेवारी रोजी महापालिकेला सुटी होती. सुटीच्या दिवशी झाडे तोडण्यात आली. हा प्रकार चुकीचाच आहे. त्यात कोणतीही परवानगी दिलेली नसतानाही झाडे तोडली गेली, अशी कबुलीही आयुक्तांनी दिली.

तो दूरध्वनी कोणाचा?झाडे तोडण्यासाठी रविवारी सुटीदिवशी कंत्राटदार क्रेन व कटरसह आमराई उद्यानात आला. तेथील कर्मचाऱ्यांनी सुरूवातीला त्याला अडविले. पण त्याने झाडे तोडण्यापोटी भरलेल्या रकमेची पावती दाखविली. यावेळी कर्मचाºयांनी वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क साधून माहिती दिली होती. त्यातच आॅफिसर्स क्लबच्या दूरध्वनीवरून झाडे तोडण्याबाबत कंत्राटदाराला दूरध्वनी आला होता, असे आयुक्तांनी सांगितले. हा दूरध्वनी कोणाचा होता? असा प्रश्न उपस्थित होतो. 

जिल्हाधिकाºयांना चौकशीची विनंतीआॅफिसर्स क्लबचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. त्यांनाही वृक्षतोडीचा अहवाल पाठविला आहे. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून महापालिकेला अहवाल द्यावा, अशी विनंती केल्याचेही आयुक्त खेबूडकर यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी