लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी चार दुकानांवर महापालिकेच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली. या दुकानदारांकडून ३० हजारांचा दंड वसूल करण्यात आला. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार सहायक आयुक्त अशोक कुंभार आणि सावता खरात यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
महापालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी पथक नियुक्त केले आहे. बुधवारी महापालिकेचे पथक शहरात फिरत असताना कोल्हापूर रोडवरील स्मार्ट बझारला सोशल डिस्टन्सिंगचा भंग केल्याबद्दल दहा हजारांचा दंड करण्यात आला. पटेल चौकातील अशोक हार्डवेअरला दहा हजार, तर साईगणेश मोबाईल आणि जनता लाईट हाऊस या दुकानांकडूनही नियमांचा भंग केल्याप्रकरणी दहा हजारांचा दंड वसूल केला.
या कारवाईत वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने, धनंजय कांबळे, किशोर कांबळे, गणेश माळी, वैभव कुदळे, कोमल कुदळेे, श्रीकांत वलसे, राजेंद्र गोंधळे यांनी भाग घेतला होता.