शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अखेर शासनाकडून नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट शिथिल, ‘लोकमत’च्या दणक्याने भावी अधिकाऱ्यांना मिळाला न्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 17:37 IST

‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यातील भावी अधिकाऱ्यांना झिडकारले’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते

अशुतोष कस्तुरेकुंडल (सांगली) : पुण्यातील ‘यशदा’त महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीवेळी नॉनक्रिमिलेअरच्या कारणाने अनेक उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आल्याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठवताच शासनाला जाग आली. आता शासनाने जाहिरातीच्या पुढील वर्षातील नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल, असा अध्यादेश काढून या भावी अधिकाऱ्यांना दिलासा दिला आहे.यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथील मुलाखतीवेळी नॉनक्रिमिलेअरच्या कारणाने अनेकांना अपात्र ठरवले गेले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) मुलाखतीवेळी खुला प्रवर्ग सोडून बाकीच्या प्रवर्गातून नॉनक्रिमिलेअर असणे अनिवार्य आहे; परंतु कोणत्या वर्षातील क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करायचे आहे, याबाबत प्रत्येक जाहिरातीत तसा उल्लेख केलेला असतो; मात्र फेब्रुवारी २०२० मध्ये प्रसिद्ध झालेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवेसाठीच्या जाहिरातीत नेमक्या कोणत्या वर्षाचे प्रमाणपत्र सादर करायचे आहे, याचा स्पष्ट उल्लेख केलेला नव्हता.

नियमानुसार परीक्षा पार पडल्यानंतर मुलाखतीला जाण्याअगोदर कागदपत्रे पडताळणीवेळी जाहिरात वर्षातील प्रमाणपत्र नसल्याने अनेक उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आले होते. यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. याच काळात कोरोनाचा फैलाव झाला असल्याने बहुतांश शासकीय अधिकारी कार्यालयात नव्हते. त्यामुळे उमेदवारांनी २०२०-२१ मधील नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र काढले होते.यातील अनेक उमेदवारांनी आयोगाकडेही धाव घेतली होती; पण तेथील कर्मचाऱ्यांनी अध्यादेश बदलून आणण्याचा सल्ला दिला होता. याबाबत पुणे पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे हा विषय लावून धरण्याबाबत विनंती केली होती. ‘लोकमत’नेही ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यातील भावी अधिकाऱ्यांना झिडकारले’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर राज्य सरकारला जाग आली.याबाबत सोमवारी (दि. १३ मार्च) इतर मागास व बहुजन कल्याण विभागामार्फत आदेश जारी करण्यात आला. २०१९-२०, २०२०-२१ या कोरोनाचा प्रभाव असलेल्या वर्षातील नॉनक्रिमिलेअरची मागणी न करता २०२१-२२, २०२२-२३चे क्रिमिलेअर प्रमाणपत्र ग्राह्य धरले जावे. ज्यांना या कारणावरून मौखिक परीक्षेतून वगळण्यात आले आहे, त्या उमेदवारांना मुलाखतीची संधी देण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे. न्याय मिळाल्यानंतर अनेक उमेदवारांनी ‘लोकमत’चे आभार मानले. 

टॅग्स :SangliसांगलीMPSC examएमपीएससी परीक्षा