शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

क्लिनरच्या मृत्यूप्रकरणी जमावावर खुनाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 14:13 IST

हरिपूर रस्त्यावरील काळी वाट येथे भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिली. यात दुचाकीवरील ऋचा सुशांत धेंडे (वय ४) ही चिमुरडी ठार झाली. त्यानंतर संतप्त जमावाने ट्रकच्या क्लिनरला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचाही मृत्यू झाला. क्लिनरच्या मृत्यूप्रकरणी जमावावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देक्लिनरच्या मृत्यूप्रकरणी जमावावर खुनाचा गुन्हा दाखल नावे स्पष्ट झाल्यानंतर अटकेची कारवाई

सांगली : हरिपूर रस्त्यावरील काळी वाट येथे भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिली. यात दुचाकीवरील ऋचा सुशांत धेंडे (वय ४) ही चिमुरडी ठार झाली. त्यानंतर संतप्त जमावाने ट्रकच्या क्लिनरला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचाही मृत्यू झाला. क्लिनरच्या मृत्यूप्रकरणी जमावावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलिसांनी सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, तर चिमुरडीच्या मृत्यूप्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे. पण ट्रकचालक अद्याप फरार आहे. शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला.हरिपूर रस्त्यावर संदीप कृष्णा धेंडे (४३) हे पुतणी ऋचा सुशांत धेंडे (४) व मामाची मुलगी साक्षी असे तिघे निघाले होते. यावेळी भरधाव ट्रक (क्र. एमएच ०४ ईबी ०३५७) ने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात दुचाकीवरील ऋचा रस्त्यावर आदळली. तिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तिला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. पण तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

अपघातानंतर ट्रक हरिपूर रस्त्यावरील कमानीला जाऊन धडकला. यावेळी संतप्त जमावाने ट्रकचा क्लिनर कुमार श्रीमंत आळगीकर (३०, रा. हरिपूर) याला पकडून बेदम मारहाण केली. जमावाच्या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रकचालक फरार झाला होता. शहर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

रविवारी संदीप धेंडे यांनी शहर पोलिसांत ट्रकचालकाविरूद्ध फिर्याद दिली. त्यानुसार बेदरकारपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा पोलिसांनी चालकावर दाखल केला आहे. या ट्रकचा चालक प्रदीप माने असल्याचे रविवारी तपासात निष्पन्न झाले आहे. पण अद्याप तो फरार आहे.मृत आळगीकर यांचा भाऊ मल्लाप्पा आळगीकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यात ट्रक व मोटारसायकलच्या धडकेत चिमुरडी मृत झाल्याने जमावाने ट्रकचालक समजून कुमार आळगीकर यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून त्यांचा खून केल्याचे म्हटले आहे.

शहर पोलिसांनी जमावावर खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहे. पण रात्री अंधार असल्याने फुटेजमधील दृश्ये स्पष्टपणे दिसत नाहीत.जमावातील सहा जणांना पोलिसांनी दुपारी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या सर्वांची कसून चौकशी सुरू आहे. संशयितांची नावे स्पष्ट झाल्यानंतर अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली