रमेश कवाळे यांनी बाबूराव श्रीमंत कवाळे, धनंजय बाबूराव कवाळे, अजय बाबूराव कवाळे, ओंकार धनंजय कवाळे (सर्व रा. आरग) यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. बाबूराव श्रीमंत कवाळे यांनी रोहित रमेश कवाळे, आकाश सुरेश कवाळे, सागर संतोष कवाळे, राहुल रमेश कवाळे, सौरभ संतोष कवाळे, रमेश अप्पासाहेब कवाळे (सर्व रा. आरग, ता. मिरज) यांच्याविरुद्ध मारहाणीची फिर्याद दिली आहे.
रमेश कवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीत बाबूराव याच्यासह सर्वांनी संगनमताने आम्ही विहिरीवर मोटार बसविणार, तुम्हाला काय करायचे ते करा, असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करून मारहाण केल्याचे म्हटले आहे, तर बाबूराव कवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीत विहिरीत किती पाणी आहे हे पाहण्यासाठी गेलाे असताना रोहित याच्यासह अन्य साथीदारांनी शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केल्याचे म्हटले आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांत नोंद आहे.