शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

पन्नास वर्षांनंतरही खुजगावातील जमिनी पाटबंधारेच्याच नावावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 00:59 IST

विकास शहा । शिराळा : धरण चांदोली की खुजगाव, हा वाद होऊन धरण चांदोलीत झाले. परंतु खुजगाव येथे धरणासाठी ...

ठळक मुद्देधरणासाठी संपादित जमिनींचा प्रश्न। कसताहेत शेतकरी, पण अडचणी अनेक

विकास शहा ।शिराळा : धरण चांदोली की खुजगाव, हा वाद होऊन धरण चांदोलीत झाले. परंतु खुजगाव येथे धरणासाठी परिसरातील जमिनी संपादित केल्या होत्या. त्यास ५0 वर्षे पूर्ण होत आली तरी, जमिनी संबंधित शेतकऱ्यांना परत मिळाल्या नाहीत. शेकडो एकर जमिनी अजूनही पाटबंधारे विभागाच्याच नावे आहेत.

१९६९-७० च्या दरम्यान खुजगाव येथे धरणासाठी पाटबंधारे विभागाने जमिनी संपादित केल्या. त्यानुसार त्या सातबारावर ‘डेप्युटी इंजिनिअर, वारणा विभाग, इस्लामपूर’ हे नाव भोगवटदारसदरी नोंद झाले. त्यानंतर धरण खुजगाव की चांदोलीला, हा वाद सुरू झाला. अखेर धरण चांदोलीत झाले. तत्पूर्वी खुजगाव येथे धरणासाठी खुजगाव, पणुंब्रे, चरण, सोनवडे, करुंगली, मराठवाडी या गावांतील शेकडो एकर जमिनी संपादित केल्या. त्या पाटबंधारे विभागाच्या नावे आहेत. जमिनी शेतकरी कसत आहेत, मात्र भोगवटदार म्हणून पाटबंधारेचे नाव आहे. शेतकऱ्यांना कर्जासाठी अथवा विक्रीसाठी गरज पडल्यावर त्यांनी जमिनीचे साताबारा पाहिले असता, जमीन आपल्या नावावर नसल्याचे लक्षात आले.

खुजगाव येथील शेतकºयांनी तत्कालीन विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याकडे ही व्यथा मांडली. त्यावेळी त्यांनी खुजगाव येथील ५६४ शेतकºयांच्या सातबारावरील इतर हक्कात या जमिनीची खरेदी अथवा बिगरशेती खरेदी-विक्री करू नये, ही शर्त खुजगावऐवजी चांदोली येथे धरण झाल्याने रद्द करण्याची शिफारस केली होती. याची तपासणी करून ही अट रद्द करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांच्याकडे ६ आॅक्टोबर २०१० ला आदेश दिला होता. त्यानंतर २९ जून २०१२ ला जिल्हाधिकाºयांनी फक्त खुजगाव येथील निर्बंध उठविले. मात्र इतर गावांची कार्यवाही पूर्ण झालेली नाही.

जमीन शेतक-यांच्या नावावर नसल्याने कर्ज मिळत नाही. जमीन विकताही येत नाही. अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळाली नाही. या शेतकºयांनी मंगळवार, दि. २४ रोजी आमदार मानसिंगराव नाईक, तहसीलदार गणेश शिंदे यांची भेट घेऊन मागणी सांगितली.

 

  • शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

खुजगाव धरण होणार म्हणून शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या. मात्र चांदोली येथे धरण झाले. जमिनी अद्याप पाटबंधारे विभागाच्याच नावावर आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गास जमिनी हस्तांतरित करणे, कर्ज काढणे अडचणीचे झाले आहे, असे राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे संघटक बाळासाहेब नायकवडी यांनी सांगितले.

 

आम्ही जमीन कसतो, मात्र जमीन आमच्या नावावर नाही. त्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. याचा विचार करुन आमच्या जमिनीवरील ही शर्त रद्द करावी.- धर्मराज शिंगमोडे, शेतकरी, खुजगाव.

टॅग्स :SangliसांगलीGovernmentसरकार