शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास टक्के उपस्थितीच्या सक्तीने शिक्षकांना कोरोनाच्या दाढेत देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 13:42 IST

CoronaVirus Sangli : राज्यात ३० एप्रिलपर्यंत शंभर टक्के शाळा बंदचे आदेश असताना सांगली जिल्ह्यात मात्र ५० टक्के शिक्षकांची शाळेत उपस्थिती सक्तीची करण्यात आली आहे. शिक्षक परिषदेने याला तीव्र विरोध केला असून शिक्षकांना कोरोनाच्या दाढेत देऊ नका असे आवाहन केले आहे.

ठळक मुद्देपन्नास टक्के उपस्थितीच्या सक्तीने शिक्षकांना कोरोनाच्या दाढेत देऊ नकाऑनलाईन अभ्यास सुरुच राहणार

सांगली : राज्यात ३० एप्रिलपर्यंत शंभर टक्के शाळा बंदचे आदेश असताना सांगली जिल्ह्यात मात्र ५० टक्के शिक्षकांची शाळेत उपस्थिती सक्तीची करण्यात आली आहे. शिक्षक परिषदेने याला तीव्र विरोध केला असून शिक्षकांना कोरोनाच्या दाढेत देऊ नका असे आवाहन केले आहे.परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष राजेंद्र नागरगोजे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे सर्वच शाळा ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण बंद ठेवल्या जाणार आहेत. नजिकच्या सातारा, रत्नागिरीसह काही जिल्ह्यांतही शाळा व शिक्षकांना पूर्ण सुटटी दिली गेली आहे. सांगली जिल्ह्यात मात्र पन्नास टक्के शिक्षकांना शाळेत हजर राहण्यास सांगितले आहे. परीक्षेच्या निकालाची तयारी किंवा शाळेची दैनंदिन प्रशासकीय कामांच्या नावाखाली शिक्षकांना शाळेत येण्याचे फर्मान आहे. यामुळे शासनाच्या आदेशाचे उल्लंघन अधिकारीच करत आहेत. शिक्षकांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती आहे.नागरगोजे यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी शाळा बंद राहतील असा स्पष्ट आदेश दिला आहॆ, त्याचे काटेकोर पालन करायला हवे. त्यामुळे शिक्षकांनी शाळेत जाऊ नये. इतर कर्मचाऱ्यांनाही बोलवू नये. कोरोनाच्या उग्र लाटेत स्वत:सह कर्मचार्यांनाही सुरक्षित ठेवावे. विद्यार्थ्यांनाही कोणत्याही कारणास्तव शाळेत बोलवू नये.ऑनलाईन अभ्यास सुरुच राहणारदरम्यान, शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी परिपत्रकात म्हटले आहे की, लॉकडाऊन असले तरी दैनंदिन कामासाठी ५० टक्के शिक्षकांनी शाळेत यायचे आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरुच ठेवायचे आहे. या कालावधीत कोणीही मुख्यालय सोडायचे नाही. दहावी व बारावी परीक्षेसाठी नियुक्त शिक्षकांनी लसीकरण करुन घ्यायचे आहे, अन्यथा त्यांच्याकडे ४८ तासांपुर्वीचे कोरोना चाचणी निगेटिव्ह प्रमाणपत्र असायला हवे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली