शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘बीएएमएस’च्या व्यवस्थापन कोट्याची पाचपट फीवाढ; आदेश येण्यापूर्वीच अंमलबजावणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 17:44 IST

विद्यार्थी, पालक संभ्रमावस्थेत

सांगली : राज्यातील खासगी आयुर्वेदिक व होमिओपॅथी महाविद्यालयांनी व्यवस्थापन कोट्यातून दिल्या जाणाऱ्या बीएएमएस प्रवेशाकरीता मागील वर्षापेक्षा पाचपट शुल्कवाढ लागू केली आहे. शुल्क नियामक प्राधिकरणाच्या आदेशापूर्वीच याची अंमलबजावणी सुरु केल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.खासगी महाविद्यालयांच्या व्यवस्थापन कोट्यातील अभ्यासक्रम शुल्कमध्ये वाढ करताना शुल्क नियामक प्राधिकरणाचे शुल्क वाढीसंदर्भात आदेश होणे महत्त्वाचे असते. अशा स्थितीत अद्याप प्राधिकरणाने कोणतेही लेखी आदेश काढलेले नसताना पाचपट शुल्क मंजूर होणार हे गृहीत धरुन महाराष्ट्रातील बहुतांश आयुर्वेद महाविद्यालयांनी पाचपट शुल्कवाढ केली आहे. अभ्यासक्रमांचे नियमित शुल्कही अद्याप निश्चित नाही. पाचपट शुल्कवाढीचा निर्णय झाल्यास व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ४५ ते ६० लाख रुपये मोजावे लागतील.वास्तविक शासनाने आयुर्वेदिक व होमिओपॅथी महाविद्यालांच्या शुल्कमध्ये पाचपट वाढ करावी म्हणून शुल्क नियामक प्राधिकरणास पत्र पाठविले आहे. प्राधिकरणाने त्यावर अद्याप निर्णय दिलेला नाही. अशा स्थितीत शुल्कवाढीचा निर्णय गृहीत धरुन पाचपट अधिक शुल्क मागणी महाविद्यालयांकडून सुरु झाली आहे.एकीकडे प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. पहिल्या फेरीचा निकाल समोर आला आहे. पहिल्या फेरीत १० ते १२ सप्टेंबरपर्यंत पसंतीक्रम भरण्याची मुदत होती. ती भरल्यानंतर १३ तारखेला शासनाने फीवाढीची शिफारस प्राधिकरणाला केली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचा गोंधळ झाला आहे.

शासनाच्या पत्रात काय म्हटले आहे?शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने १३ सप्टेंबरला शुल्क नियामक प्राधिकरणाला पत्र पाठविले. खासगी विनाअनुदानित आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या संस्थात्मक कोट्याच्या (एनआरआयसह) शुल्कात पाचपट वाढ करण्यास हरकत नाही, असे त्या पत्रात म्हटले आहे. या पत्राचा आधार घेत महाविद्यालयांनी वाढीव शुल्क मागणी सुरु केली आहे.

शुल्कवाढीबाबतचा निर्णय प्रवेश प्रक्रियेपूर्वी होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीचा पसंतीक्रम टाकल्यानंतर शासनाने फीवाढीचा पत्रव्यवहार केला. तसेच अचानक पाचपट फी वाढ करणे ही गोष्ट विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे. - डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक

टॅग्स :Sangliसांगलीdoctorडॉक्टर