शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

भीती वाटली, पण अंगात जिद्द जास्त होती : उर्वी पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 22:07 IST

थरार, भीती, आनंद अशा विविध भावनांच्या संमिश्र गर्दीतून जिद्दीने आणि धाडसाने वाट काढत सांगलीच्या उर्वी अनिल पाटील या चिमुकलीने तब्बल १३ हजार ८00 फुटांचे ‘सरपास’ हे हिमशिखर सर

ठळक मुद्देआता १७ हजार फुटांवरील पीन पार्वती शिखर सर करायचंय...

- अविनाश कोळी-सांगली

थरार, भीती, आनंद अशा विविध भावनांच्या संमिश्र गर्दीतून जिद्दीने आणि धाडसाने वाट काढत सांगलीच्या उर्वी अनिल पाटील या चिमुकलीने तब्बल १३ हजार ८00 फुटांचे ‘सरपास’ हे हिमशिखर सर करून वयाच्या केवळ दहाव्यावर्षी विक्रम प्रस्थापित केला आहे. ट्रेकिंगच्या टीममध्ये प्रवेश करण्यापासून शिखरावरील आनंदोत्सव साजरा करेपर्यंत अनेक अडचणींच्या खाचखळग्यातून उर्वीने प्रवास केला. तिला या प्रवासादरम्यान आलेले अनुभव, त्यासाठी तिने केलेली पूर्वतयारी, मिळालेले पाठबळ याबाबत तिने ‘लोकमत’शी साधलेला हा थेट संवाद...प्रश्न : अतिथंडीच्या हिमाचल प्रदेशातील सरपास शिखर सर करताना तुला मनात भीती नाही वाटली?उत्तर : ट्रेकिंगवर जाताना किंवा शिखर सर करताना भीती जाणवली नाही, मात्र जेव्हा बर्फ वितळत होता आणि पाय रोवून पुढे जाणे कठीण जात होते, तेव्हा मनात भीती वाटू लागली. तरीही शिखर सर करण्याची जिद्द मनात घट्ट होती. त्यामुळे भीतीवर मात केली. बराच पल्ला गाठल्यानंतर जेव्हा खाली पाहिले, तेव्हाचा प्रसंगही थरारक होता.

प्रश्न : तू इतकी लहान असताना तुला प्रवेश दिला कसा आणि तुझ्यासोबत ट्रेकिंगवर असलेल्या सहकाऱ्यांना काय वाटत होते?उत्तर : हो, जेव्हा ट्रेकिंगची पूर्वतयारी सुरू झाली, तेव्हा कॅम्पमध्ये मला पाहून तिथल्या प्रमुखाने सर्वांना विचारले, ही मुलगी इथे आलीच कशी? तेव्हा वाटले की आता बहुतेक आपल्याला पुढे जाता येणार नाही. तरीही मी आत्मविश्वासाने त्यांच्यासमोर उभी होते. अखेर माझी तयारी, आत्मविश्वास आणि जिद्द यामुळे प्रवेश मिळाला आणि ट्रेकिंगच्या अद्भूत प्रवासाला सुरुवात झाली. अनेकांना काळजी वाटत होती, पण प्रवास सुरू झाला की प्रत्येकाने दुसºयाची नव्हे, स्वत:ची काळजी घ्यायची असते. त्यामुळे त्यानंतर मी माझी काळजी घेत पुढे जात होते. बाबा माझ्यासोबत असल्याने आधार वाटत होता.

प्रश्न : सोबत तुझे बाबा नसते तर शिखर सर झाले असते?उत्तर : हो नक्कीच झाले असते, पण थोडा वेळ लागला असता. बाबा माझी काळजी घेत होते. जेव्हा तापमान उणे आठ अंशाखाली जात होते, तेव्हा त्यांनी माझ्या अंगावर दोन गोधडी टाकून मला आधार दिला. मी कधीच तोंडावर पांघरुण घेत नसे, पण बाबांनी तेव्हा जबरदस्तीने मला पूर्ण झाकून टाकले. कारण, तापमानाशी मुकाबला करण्याशिवाय त्यावेळी पर्याय नव्हता. तरीही मला आत्मविश्वास वाटतो की, हे शिखर मी कोणत्याही परिस्थितीत सर करू शकले असते. या आत्मविश्वासामुळे आणि इतक्या दिवसांच्या पूर्वतयारीमुळे या गोष्टी शक्य झाल्या आहेत. शिखर सर केल्यानंतरचा आनंदही फार वेगळा होता.

प्रश्न : काय पूर्वतयारी केली होती आणि सर्वात जास्त अडचण तुला कोणत्या गोष्टीची वाटली?उत्तर : दररोज दोन तास समुद्रकिनारी रेतीमध्ये चालण्याचा सराव करीत होते. योगासनांचे सर्व प्रकार करीत होते. त्यासाठी पहाटे लवकर उठावे लागत असे. आठ तास चालण्याचा सरावही केला. चालण्याची क्षमता वाढविल्यामुळे ट्रेकिंगमध्ये त्याचा फायदा झाला. तरीही सरळ चालणे आणि ट्रेकिंग करणे यात खूप फरक असतो. त्यामुळे माझे पाय दुखायचे. त्यावेळी बाबा आणि मी एकमेकांच्या पायाला तेल लावून मॉलीश करीत असे. अशा अनेक अडचणी आल्या. सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे मासा. माझ्या रोजच्या आहारात मासा असतो. मासे, चिकन याशिवाय जेवणाचा विचार मला करवतच नाही. इतके मला हे पदार्थ आवडतात. ट्रेकिंगला या गोष्टींवर निर्बंध असतात. त्यामुळे मासे खाण्याची खूप इच्छा ट्रेकिंग करताना होत होती, पण जवळ असलेले पदार्थ खाऊनच इच्छा मारली.

प्रश्न : आता तुझे पुढचे उद्दिष्ट काय असणार आहे?उत्तर : हिमाचल प्रदेशातीलच पीन पार्वती हा १७ हजार ४५७ फुटांवरील पर्वत सर करण्याची इच्छा आहे. हा पर्वत कधी सर करायचा, त्यासाठी काय पूर्वतयारी करायची याबाबत कोणताही विचार सध्या केलेला नाही. पण उद्दिष्ट ठरविले आहे. नृत्यात, अवकाश संशोधन क्षेत्रातही मला करिअर करायचे आहे. यापैकी भरतनाट्यम्चे शिक्षण सुरू झाले आहे.                                                                                                             

टॅग्स :Sangliसांगली