शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापास आजन्म कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 16:55 IST

सर्व कुटुंबीय झाेपलेले असताना, आरोपीने स्वत:च्या मुलीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला

सांगली : स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापास न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना तासगाव तालुक्यात घडली होती. शिक्षा झालेला आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले.खटल्याची अधिक माहिती अशी की, आरोपी कुटुंबीयांसह तासगाव तालुक्यातील एका गावात राहण्यास होता. २३ एप्रिल २०१९ रोजी सर्व कुटुंबीय झाेपलेले असताना, आरोपीने स्वत:च्या मुलीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावर त्याच्या पत्नीने प्रतिकार केला असता, त्याने तिला शिवीगाळ व मारहाण केली.त्यानंतर त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. यानंतर पीडितेच्या आईने तासगाव पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात फिर्याद दिली. तासगावचे सहायक पोलीस निरीक्षक यू. एम. दंडिले यांनी या प्रकरणाचा तपास करून त्याच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हातरोटे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. यात सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, पीडित मुलगी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. उपलब्ध साक्षी-पुराव्याआधारे नराधम बापास आजन्म कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली. मरेपर्यंत जन्मठेपेशिवाय २५ हजार रुपये दंडही करण्यात आला.येथील विशेष पोक्सो न्यायालयात न्यायमूर्ती हातरोटे यांच्यासमोर या खटल्याची जलदगतीने सुनावणी होत महिन्याच्या आत निकाल झाला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फेही पीडित मुलीस विशेष नुकसानभरपाई अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीsexual harassmentलैंगिक छळCourtन्यायालय