शहरं
Join us  
Trending Stories
1
चौकशीत आरोपी डॉक्टरांचे मोठे खुलासे; सिग्नल App चा वापर, i-20 ची खरेदी अन्..., अनेक गोष्टी झाल्या उघड
2
Stock Market Bull Run: तयार राहा! शेअर बाजारात येणार आणखी एक बूल रन; सेन्सेक्स पोहोचणार १,०७,००० पर्यंत?
3
नाराजीचा भूकंप! एकनाथ शिंदे वगळता शिंदेसेनेचे एकही मंत्री कॅबिनेट बैठकीला हजर नाहीत, कारण...
4
'हिंदुत्वा'वरून प्रकाश महाजन यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात; "राजकारणात भूमिका बदलल्या पाहिजेत, पण.."
5
"...तर मी कोणताही प्रश्न न विचारता राजकारणातून निवृत्ती होईन"; प्रशांत किशोरांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली
6
Video: शिव ठाकरेच्या मुंबईतील फ्लॅटला आग! अख्खं घर जळून खाक, अभिनेता थोडक्यात बचावला
7
समजा अचानक समोर बिबट्या आलाच तर काय कराल? अशी घ्या खबरदारी
8
आमदारांच्या बैठकीत तेजस्वी यादव भावूक, म्हणाले, 'माझ्या जागी दुसऱ्या कोणाची तरी निवड करा'
9
IND vs SA: गौतम गंभीर- शुममन गिल यांच्यात खेळपट्टीवरून मतभेद? मोठ्या पराभवानंतर चर्चांना उधाण!
10
बंगळूर मेट्रो स्टेशन उडवण्याची धमकी; ई-मेलमध्ये लिहिलेले कारण ऐकून अधिकारीही चक्रावले!
11
Armaan Malik : Video -"आधी तुझ्या मुलांना गोळ्या घालू, मग तुला..."; करोडपती युट्यूबरला जीवे मारण्याची धमकी
12
तिच्या नखरेल अंदाजावरील गंभीरची कमेंट सगळ्यांना खटकली; पण गावसकरांना मात्र पटली! म्हणाले…
13
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
14
Supreme Court: सीबीआयचे तपास अधिकारी बोगस आहेत; सेवेत राहण्यायोग्यच नाहीत: सुप्रीम कोर्ट 
15
८व्या वेतन आयोगापूर्वी महागाई भत्ता वाढणार का? DA ते TA पर्यंत, पाहा काय मिळणार फायदा
16
Mumbai: ‘माहे’श्रेणीतील पहिले पाणबुडीरोधक स्वदेशी जहाज येत्या सोमवारी नौदलात!
17
Bihar: शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी, पाटण्यातील गांधी मैदानात रोषणाई, थेट बंगळुरूहून मागवली फुले
18
CJI: कलम ३७० ते नुपूर शर्मा! नवे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे 'हे' निकाल देशभर गाजले
19
हायव्होल्टेज ड्रामा! "हा माझ्या मामाचा मुलगा, ८ वर्षांपासून प्रेम..."; लग्नात नवऱ्याच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री
20
बँक ऑफ बडोदामधून ₹६० लाखांचं Home Loan घेण्यासाठी किती हवी सॅलरी; किती भरावा लागेल EMI
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना फसवाल, तर भाजपचे तण ठेवणार नाही: राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:10 IST

कडेगाव : शेतकºयांना फसवायला जाल, तर भाजप नावाचे तण शिल्लक ठेवणार नाही. राज्यातील शेतकरी कमळाला योग्य ते औषध मारतील. कुठल्यावेळी कोणते औषध फवारायचे, याची आम्हाला जाण आहे. यामुळे कमळाचे समूळ उच्चाटन होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याने देशात ...

कडेगाव : शेतकºयांना फसवायला जाल, तर भाजप नावाचे तण शिल्लक ठेवणार नाही. राज्यातील शेतकरी कमळाला योग्य ते औषध मारतील. कुठल्यावेळी कोणते औषध फवारायचे, याची आम्हाला जाण आहे. यामुळे कमळाचे समूळ उच्चाटन होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याने देशात सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळविला, त्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्याहस्ते कारखान्याचे अध्यक्ष आ. मोहनराव कदम, कार्यकारी संचालक शरद कदम व संचालक मंडळाचा सत्कार समारंभ झाला. यावेळी खासदार राजू शेट्टी बोलत होते. यावेळी आमदार डॉ. विश्वजित कदम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष व बारामती तालुक्यातील नेते सतीश काकडे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब यादव उपस्थित होते. यावेळी खासदार राजू शेट्टी यांनी मागील वर्षी साखरेच्या पडलेल्या दराकडे बोट दाखवून ऊसदर पाडण्यासाठी भाजपच्या हस्तकांनी कटकारस्थान करून कच्ची साखर आयात करावी, असे सरकारच्या डोक्यात भरवले व थंड डोक्याने चाल करून शेतकºयांची फसवणूक केली. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटना असल्या चाली हाणून पाडेल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.शेट्टी म्हणाले, एफआरपी न दिलेले बहुतांशी सर्व कारखाने भाजप नेत्यांचे आहेत. भाजपमध्ये गेल्यावर शेतकºयांचे पैसे बुडवायचा परवाना मिळतोय, असा समज या कारखानदार नेत्यांचा झाला आहे. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकºयांचा एक पैसाही बुडू देणार नाही. एफआरपी न देणाºया कारखान्यांवर संबंधित जिल्हाधिकाºयांनी नियमानुसार साखर जप्तीची कारवाई करणे गरजेचे आहे. भाजपचे सरकार याला खो घालत आहे. हे सरकार शेतकºयांची फसवणूक करत आहे.स्वागत सत्यजित यादव-देशमुख यांनी केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष सतीशराव काकडे, बाळकृष्ण यादव, ज्येष्ठ नेते लालासाहेब यादव, सोनहिरा कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम यांनी मनोगत व्यक्त केले. अविनाश यादव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी ज्येष्ठ नेते भीमराव मोहिते, अ‍ॅड. ए. बी. मदने यांच्यासह सर्व संचालक, सभासद व ऊसउत्पादक शेतकरी उपस्थित होते.२७ ला जयसिंगपूरमध्ये ऊस परिषदराजू शेट्टी म्हणाले, ऊस उत्पादक शेतकºयांच्या प्रश्नांसाठी स्वाभिमानीचा २७ आॅक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना परंपरेनुसार ऊस उत्पादक शेतकºयांच्या परिषदेत ऊसदराचा निर्णय चर्चेअंती जाहीर करणार आहे, मात्र येनकेन कारणाने ऊसदर पाडला जात असला तरी, गतवर्षीपेक्षा निश्चितच जादा ऊसदराची मागणी राहणार असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.पक्ष वेगळे, परंतु विचार एकच : विश्वजित कदमयावेळी आमदार विश्वजित कदम खासदार राजू शेट्टी यांना म्हणाले, तुमचे-आमचे पक्ष वेगळे असले तरी, विचार एकच आहेत. आम्ही शेतकरी कुटुंबातीलच असून, शेतकºयांचे हित जोपासण्याचे धोरण राबविले आहे. दिवंगत आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या विचाराने सोनहिरा यशस्वी वाटचाल करीत आहे. भाजप सरकार सहकार मोडण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा सरकारचा एकसंधपणे पायउतार केला पाहिजे.त्या कारखान्याच्या ऊस बिलासाठी आंदोलन करू : शेट्टीस्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर शेतकºयांच्या ऊस बिलासाठी आंदोलन करते; परंतु याच परिसरातील काही कारखाने विहित वेळेत उसबिले अदा करीत नाहीत. याकडे खासदार राजू शेट्टी यांचे लक्ष वेधले. यावर खासदार राजू शेट्टी यांनी अशा कारखान्यांकडून ऊसबिले वसूल करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल व शेतकºयांच्या पाठीशी ठाम उभा राहील, असे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले....तर आमदार विश्वजित कदम यांचा जाहीर सत्कारज्या कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी व सभासद समाधानी नाहीत, त्या कारखान्याची मी पायरी चढत नाही. आमदार डॉ. पतंगराव कदम यांचा सोनहिरा कारखाना लवकरच देशात सर्वाधिक ऊसदर देईल, अशी ग्वाही आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सोनहिराच्या सर्वसाधारण सभेत दिली होती. याचा उल्लेख करून खासदार राजू शेट्टी म्हणाले, विश्वजित कदम आपला उद्देश व मनोदय चांगला आहे. हे ध्येय गाठण्यासाठी प्रारंभी राज्यात सर्वाधिक ऊसदर द्यावा, मी स्वत: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आमदार विश्वजित कदम व कारखान्याचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांचा सत्कार करणार आहे, असे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.