शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत शेतकरी संघटनेतर्फे १२ रोजी देशव्यापी परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 14:15 IST

सांगली : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर देशव्यापी लढा निश्चित करण्यासाठी येत्या १२ डिसेंबर रोजी सांगलीत देशव्यापी शेतकरी हुतात्मा स्मृती परिषद ...

ठळक मुद्देसांगलीत शेतकरी संघटनेतर्फे १२ रोजी देशव्यापी परिषदलढ्याची दीशा ठरणार: रघुनाथदादा पाटील

सांगली : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर देशव्यापी लढा निश्चित करण्यासाठी येत्या १२ डिसेंबर रोजी सांगलीत देशव्यापी शेतकरी हुतात्मा स्मृती परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले की, कापडविक्रीतून शेतकऱ्यांचे व भारतीयांचे शोषण करणाऱ्या ब्रिटीश सरकारविरुद्ध हुतात्मा बाबू गेणू यांनी १२ डिसेंबर १९३0 रोजी विदेशी कापडाने भरलेल्या ट्रकसमोर हौतात्म्य पत्करले होते. भारतीय शेतकऱ्यांच्या असंतोषाचे जनक व शेतकऱ्यांचे पंचप्राण म्हणून ओळखले जाणारे शरद जोशी यांनीही १२ डिसेंबर २0१५ रोजी शेवटचा श्वास घेतला होता. त्यामुळे याच तारखेस शेतकरी हुतात्मा स्मृती परिषदेचे आयोजन केले आहे.

या परिषदेस पंजाबचे शेतकरी नेते सतनाम सिंग, समशेरसिंह दहिया, कन्हैय्यालाल सिहाग, लालबहादूर शास्त्री यांचे वंशज संजयसिंह नाथ, तामिळनाडूचे देवसिंग मणी, नित्या मोहोर, आंध्रप्रदेशचे जनरल रेड्डी आदी उपस्थित राहणार आहेत. सांगलीच्या रेल्वे स्थानकाजवळील कल्पतरु मंगल कार्यालयात १२ डिसेंबरला दुपारी १ वाजता परिषद होणार आहे.ऊसाला प्रतिटन चार हजार दर द्या, अन्यथा दोन कारखान्यांमधील अंतराची अटक काढून टाका, आपत्ती निवारण कायद्यात दुष्काळाचा, महापुराचा समावेश करून जिरायत शेतीला एकरी ५0 हजार रुपये, बागायत शेतीला १ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, गोवंश हत्या बंदी, वन्यजीव संरक्षण, पाळीव प्राण्यांशी निर्दयी वागणूक, आवश्यक वस्तू कायदा, भू-संपादन, कमाल जमीन धारणा इत्यादी शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्य घटनेची पुनर्स्थापना करण्यात यावी, सरसकट सर्व शेतकऱ्यांना सर्व कर्जातून व वीज बिलातून मुक्त करावे, शेतकऱ्यांना बाजाराचे, तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळायला हवे, शेतीमालावरील निर्यातबंदी उठवावी, रेडी रेकनर प्रमाणे शेतीला कर्जपुरवठा करावा आदी मागण्यांची चर्चा या परिषदेत केली जाणार आहे.शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करताना देशव्यापी लढ्याची दिशाही निश्चित केली जाणार आहे. अशा अनेक परिषदांचे आयोजन वेगवेगळ््या ठिकाणी केले जाणार आहे. सांगलीत कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, उत्तरप्रदेश याठिकाणचे शेतकऱ्यांचे नेते उपस्थित राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही परिषद अत्यंत महत्त्वाची व क्रांतिकारी ठरणार आहे, असे पाटील म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली