शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन सात-बारा नोंदणी ठप्प झाल्याने शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 16:20 IST

जत तालुक्यातील महसूल खात्याचे आॅनलाईन सात-बारा नोंदणी करण्याचे काम ठप्प झाले आहे. याचा शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सात-बारा उताºयावरील नोंदी व्यवस्थित झाल्या नसल्याने व त्याचे उतारे शेतकºयांना वेळेत न

ठळक मुद्देशासनाने यंत्रणा राबवली; परंतु सोय होण्याऐवजी गैरसोय मोठ्या प्रमाणात झाली आहे, अशी तक्रार शेतकरी करत आहेत.

 

जत : जत तालुक्यातील महसूल खात्याचे आॅनलाईन सात-बारा नोंदणी करण्याचे काम ठप्प झाले आहे. याचा शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सात-बारा उताºयावरील नोंदी व्यवस्थित झाल्या नसल्याने व त्याचे उतारे शेतकºयांना वेळेत न मिळाल्यामुळे तालुक्यातील सुमारे पन्नास टक्के शेतकºयांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही, अशी तक्रार जत तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

आॅनलाईन काम ठप्प झाल्यामुळे गावकामगार तलाठी कार्यालयातील शेतजमिनीची खरेदी, पिकाच्या नोंदी, वारसाचे बक्षीसपत्र, हक्क सोडपत्र, विहीर व बोअर नोंदी, बँक बोजा, ई-करार, बोजा चढविणे अशी कामे प्रलंबित राहीली आहेत. जोपर्यंत आॅनलाईन उताºयातील दोष दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत पूर्वीप्रमाणे हस्तलिखित उतारे, ‘आठ अ’ उताºयाचे व्यवहार करण्यास शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आॅनलाईन उताºयातील नोंदी करताना महसूल कर्मचाºयांनी चुका केल्या आहेत. परंतु त्याचा नाहक त्रास शेतकºयांना सहन करावा लागत आहे. संगणक प्रणालीमध्ये नोंदी व्यवस्थित होत नाहीत. अनेक शेतकºयांची नावे सात-बारा उताºयातून गायब झाली आहेत. त्यामुळे शेतकरी घाबरून गेले आहेत. सात-बारा उताºयातील नावाच्या नोंदी व्यवस्थित करून मिळाव्यात यासाठी तलाठी कार्यालयात शेतकरी दिवसभर ठिय्या मारून बसत आहेत. परंतु सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे नोंदीची प्रक्रिया एकदम मंद गतीने सुरू असते. त्यामुळे दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत नवीन नोंदी होत नाहीत.

गावकामगार तलाठी कार्यालयात संगणक आॅपरेटर नेमून तलाठी आॅनलाईन नोंदी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु संगणक आॅपरेटरना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मागील वर्षभर तलाठी कार्यालयात शेतकरी सात-बारा व आठ अ उताºयावरील नोंदी व्यवस्थित करून मिळाव्यात, यासाठी हेलपाटे मारत आहेत. आॅनलाईन उतारा देऊन शेतकºयांची सोय करण्यासाठी शासनाने यंत्रणा राबवली; परंतु सोय होण्याऐवजी गैरसोय मोठ्या प्रमाणात झाली आहे, अशी तक्रार शेतकरी करत आहेत.

टॅग्स :onlineऑनलाइनSangliसांगली