शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: शेतकऱ्यांचा विरोध मावळला, शेटफळेमध्ये 'शक्तिपीठ'साठी मोजणी पुन्हा सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 11:47 IST

प्रशासनाचा भरपाईचा दिलासा; पोलीस बंदोबस्तात शांततेत कार्यवाही

आटपाडी : शेटफळे (ता. आटपाडी) गावातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणी कार्याला काही काळासाठी शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला होता. बुधवारी झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोजणी यंत्रणेपुढे अक्षरशः अंग झोकून दिले. मात्र प्रशासनाच्या समुपदेशन व संवादातून निर्माण झालेला तणाव निवळताच गुरुवारी सकाळपासून मोजणी पुन्हा सुरू झाली आणि दिवसअखेरपर्यंत सुमारे ७० टक्के मोजणी पूर्ण करण्यात आली.बुधवारी मोजणीच्या वेळी शेतकऱ्यांनी जमिनीवर झोपून आणि थेट यंत्रणेला रोखून आपला आक्रोश व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार सागर ढवळे, तसेच पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. बैठकीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान करत समजूत घातली.या संवादात डॉ. विक्रम बांदल यांनी रेडीरेकनरच्या पाचपट दराने भरपाई दिली जाईल, तसेच पिकांचे, फळबागांचे व इतर बाबींचे पंचनामे करून त्याप्रमाणे योग्य मोबदला दिला जाईल, अशी ठाम हमी शेतकऱ्यांना दिली. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे गुरुवारी मोजणीला अपेक्षित विरोध नोंदवला गेला नाही.

शांततेत मोजणी, पोलिसांचा मोठा बंदोबस्तगुरुवारी शेटफळे येथील पाटील मळा परिसरात मोजणी पार पडली. संभाव्य तणाव लक्षात घेता प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. मात्र शेतकऱ्यांनी समजूतदारपणे प्रशासनास सहकार्य केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. शांततेत मोजणी पार पडल्याने अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला.

संवादातूनच मार्ग, प्रशासनाची सकारात्मक भूमिकाशेतकऱ्यांचा विरोध मावळण्यामागे प्रशासनाच्या संयमी आणि संवादात्मक भूमिकेचा मोठा वाटा असून, उपविभागीय अधिकारी डॉ. बांदल आणि तहसीलदार सागर ढवळे यांच्या मार्गदर्शनात सर्व प्रक्रिया पार पडत आहे. यापुढील मोजणीही अशाच शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे संकेत दिले आहेत.

प्रशासन, शेतकरी समन्वय

  • शेतकऱ्यांचा विरोध नोंदवण्यात आला खरा, पण संवादातून मोजणीला गती मिळाली.
  • शेतीमाल, झाडझुडपांचे पंचनामे करून भरपाई देण्याची हमी.
  • शांततेच्या मार्गाने वाटचाल, प्रशासन आणि शेतकरी यांच्यात समन्वय आवश्यक.