शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या नेत्यांनीच भाजपचे अस्तित्व संपवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 16:27 IST

दक्षिण महाराष्ट्रात शासन आणि साखर कारखानदारांविरोधात एकवटलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोडीत काढली. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना भाजपची ऊर्जा दिली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या नेत्यांनीच भाजपचे अस्तित्व संपवलेपुन्हा साखर कारखानदारांना सुगीचे दिवस

अशोक पाटील इस्लामपूर : दक्षिण महाराष्ट्रात शासन आणि साखर कारखानदारांविरोधात एकवटलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोडीत काढली. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना भाजपची ऊर्जा दिली.

लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांचे पानिपत करण्यात आले. शेट्टी यांनी राष्ट्रवादी (साखर कारखानदार) यांच्याशी केलेला समझोता आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी परिधान केलेली भाजपची झूल वाळवा—शिराळ्यातील ऊस उत्पादकांना रुचली नाही. त्यामुळेच पुन्हा साखर कारखानदारांना सुगीचे दिवस आले आहेत.जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत बागणी जिल्हा परिषद मतदार संघातील निवडणूक चांगलीच गाजली. राष्ट्रवादीचे उमेदवार वैभव शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु राष्ट्रवादीचेच संभाजी कचरे यांनी बंडखोरी केली आणि जयंत पाटील आणि शिंदे गटातही दुही निर्माण झाली. त्यातच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांना विकास आघाडीची उमेदवारी देण्यात आली.

येथूनच घराणेशाहीचा मुद्दा पुढे आला आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेतही फुटीची ठिणगी पडली. तेव्हापासून संघटनेतील धुसफूस वाढत गेली. एकमेकांवर आरोप—प्रत्यारोप झाले आणि या संघटनेतून खोत यांना बाहेर काढण्यात आले. यामुळे रयत क्रांती संघटनेचा जन्म झाला. या संघटनेला प्रथमत: इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनीही मोठी साथ दिली होती.वाळवा—शिराळ्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, नगराध्यक्ष निशिकांत पाटील आणि आष्ट्याचे वैभव शिंदे यांनी भाजपला ताकद देण्यासाठी प्रयत्न सुरु केले. या तिघांची एकवटलेली ताकद भाजपचे एकनिष्ठ विक्रम पाटील, महाडिक गटाचे राहुल महाडिक यांना रुचली नाही. त्यातच नगराध्यक्ष पाटील आणि मंत्री खोत यांच्यातही काही कारणांनी मतभेद निर्माण झाले.

कालांतराने त्यांच्यातही फूट पडली. यानंतर महाडिक आणि विक्रम पाटील यांनी मंत्री खोत यांच्याशी संपर्क वाढवत नगराध्यक्ष पाटील यांना एकाकी पाडले. यामुळेच अंतिम टप्प्यापर्यंत भाजपच्या पदरात असलेली विधानसभेची उमेदवारी शिवसेनेकडे वर्ग झाली. याचे खापर मंत्री खोत यांच्यावरच फोडले जात आहे.मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या नावाचा वापर करुन मोहिते बंधूंनी मोठ्या प्रमाणात कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय सुरु केला. सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला. परंतु वर्षभरातच हा फसवणुकीचा गोरखधंदा उजेडात आला. या घोटाळ्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हेच मुख्य असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी करुन खळबळ माजवली होती. परंतु विद्यमान आमदार जयंत पाटील यांनी मात्र या कडकडनाथप्रश्नी ब्र शब्दही काढला नाही. त्यामुळेच विरोधात असलेल्या अपक्ष निशिकांत पाटील आणि शिवसेनेचे गौरव नायकवडी यांना चांगली मते मिळाली.शिराळा मतदार संघातही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उघडपणे भाजपला आणि आतील बाजूने महाडिक गटाला ताकद दिली. इस्लामपूर मतदार संघात शिवसेनेचा प्रचार करण्यात खोत आघाडीवर होते. परंतु कामेरी येथे झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत मंत्री खोत यांचा आवाज का दबला गेला, हे अनुत्तरीत आहे.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSangliसांगलीSadabhau Khotसदाभाउ खोत