शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: द्राक्ष व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची ३२ लाख २२ हजारांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 15:21 IST

तासगाव : तासगाव तालुक्यातील सावर्डे, मनेराजुरी, तासगाव, चिंचणी, वाघापूर व वंजारवाडी येथील शेतकऱ्यांची ३२ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक ...

तासगाव : तासगाव तालुक्यातील सावर्डे, मनेराजुरी, तासगाव, चिंचणी, वाघापूर व वंजारवाडी येथील शेतकऱ्यांची ३२ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा तासगाव पोलिसात दाखल झाला आहे. याप्रकरणी अशोक डोंगरा चंदीगड व रवी माने गोटेवाडी याच्या विरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद शंकर कुंडलिक माने सावर्डे यांनी दिली आहे.पोलिसात दिलेल्या तक्रारीत माने यांनी म्हटले आहे, व्यापारी अशोक डोंगरा व रवी माने हे दोघे गेले अनेक वर्षांपासून आमच्या भागात द्राक्ष खरेदी करत होते. यामुळे त्याने विश्वासार्हता निर्माण केली होती. जानेवारी ते मार्च या कालावधीत त्याने सावर्डे, मनेराजुरी, तासगाव, चिंचणी, वाघापूर, वंजारवाडी या गावातील काही शेतकऱ्यांची उधारीवर द्राक्ष खरेदी केली. त्यानंतर तो पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला. यानंतर डोंगरा याने तासगाव येथून पोबारा केला व रवी मानेने उडवा उडवीची उत्तरे दिली. जानेवारी ते मार्चदरम्यान द्राक्षाची खरेदी केली असून अद्यापही ते पैसे देत नाहीत. ही रक्कम ३३ लाख २२ हजार इतकी आहे. याप्रकरणी अशोक डोंगरा व रवी माने यांच्यावर तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पोलिस कॉन्स्टेबल मारुती गायकवाड यांनी दिली, तर याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजीव अन्नछत्रे करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी