द्राक्षावर कीड पडल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 11:41 PM2018-12-16T23:41:42+5:302018-12-16T23:41:46+5:30

मिरज : द्राक्ष पिकावर कीड पडल्याने बाग वाया जाणार, या धास्तीने भोसे (ता. मिरज) येथील दादासाहेब रामचंद्र गावडे (वय ...

Farmer suicides due to germination of grape | द्राक्षावर कीड पडल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

द्राक्षावर कीड पडल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Next

मिरज : द्राक्ष पिकावर कीड पडल्याने बाग वाया जाणार, या धास्तीने भोसे (ता. मिरज) येथील दादासाहेब रामचंद्र गावडे (वय ३०) या तरुण शेतकºयाने शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
दादासाहेब गावडे यांनी भोसे येथे अडीच एकर जमिनीपैकी अर्धा एकरात चांगले उत्पन्न मिळणाºया सोनाक्का जातीची द्राक्षबाग लावली होती. द्राक्षबाग लावल्यापासून ते विक्रमी उत्पन्न घेत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या बागेतील द्राक्षाच्या काडीला कीड लागली होती. किडीचे नियंत्रण करण्यासाठी त्यांनी बागेतील पाने तपासणीसाठी पाठविली होती. मात्र तयार झालेली द्राक्षे सुरकुतलेली दिसत होती. घडातून द्राक्षे सैल झाल्याने गावडे अस्वस्थ होते. प्रगतशील शेतकरी अशी ओळख असलेल्या दादासाहेब यांना बैलगाडी शर्यतीचा नाद होता. गुरूवारी ते घरातून बाहेर पडले होते. ते बैलगाडी शर्यतीसाठी गेले असावेत, असा प्रारंभी नातेवाईकांचा समज झाला. मात्र दोन दिवस ते घरी न परतल्याने कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते. रविवारी उसात त्यांचा मृतदेह व सोबत कीटकनाशकाची बाटली सापडली. दादासाहेब गावडे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन लहान मुली असा परिवार आहे. दादासाहेब यांच्या मृत्यूमुळे गावडे कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. वडील रामचंद्र गावडे यांनी याबाबत ग्रामीण पोलिसात वर्दी दिली आहे.
हंगाम वाया जाण्याची धास्ती
यावर्षी द्राक्षाचे पीक वाया जाणार, अशी धास्ती त्यांना वाटत होती. या अस्वस्थतेतूनच दरवर्षी बागेतून चांगले पीक काढणाºया गावडे यांनी उसाच्या शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.

Web Title: Farmer suicides due to germination of grape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.