शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: तासगाव मल्टीस्पेशालिटीबाबत खासदारांची ‘बोलाचीच कढी’; दोन वर्षांपासून धूळ खात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 17:48 IST

सहा कोटींचा निधी कुचकामी; आश्वासन हवेतच

दत्ता पाटीलतासगाव : तासगाव शहरातील जनतेच्या सोयीसाठी खासदार संजय पाटील यांच्या पुढाकाराने तब्बल सहा कोटी तीस लाख रुपयांचा निधी खर्ची टाकून कस्तुरबा गांधी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आले. तब्बल दोन वर्षांपूर्वी या हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा झाला. एक वर्षानंतर खासदारांनी लवकरच हॉस्पिटल सुरू करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यांचे आश्वासन हवेतच राहिले. खासदारांचे आश्वासन ‘बोलाचीच कढी’ ठरली असून दोन वर्षे झाले तरी हे हॉस्पिटल सुरू करण्यात पालिका प्रशासन आणि नेत्यांना अपयश आले आहे.तासगाव नगरपालिकेच्या कस्तुरबा गांधी रुग्णालयाच्या जागेवर खासदार संजय पाटील यांच्या प्रयत्नातून सहा कोटी तीस लाख रुपये खर्चून कस्तुरबा गांधी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आले. शंभर बेड ऑक्सिजन प्लॅन्टसह सर्व सुविधांनी सुसज्ज असे हॉस्पिटल उभा राहिले. १ जानेवारी २०२२ रोजी या हॉस्पिटलचे दिमाखात लोकार्पण करण्यात आले. मात्र तेव्हापासून आजतागायत हे हॉस्पिटल धूळ खात पडून आहे.एक वर्षांपूर्वी ‘लोकमत’मधून या हॉस्पिटलच्या अवस्थेबाबत आवाज उठवण्यात आला होता. त्यावेळी खासदार पाटील यांनी लवकरच हे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. त्याच वेळी उपमुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसमवेत प्रशासनाची बैठक घेऊन हॉस्पिटलचा प्रश्न मार्गी लावणार असण्याची असल्याची घोषणा केली होती. या घोषणेला आता वर्ष होत आले. हॉस्पिटलची इमारत पूर्ण होऊन दोन वर्षे झाली. मात्र खासदारांची घोषणा हवेतच राहिली.शासनाचा निधी मिळवून कोट्यवधी रुपये खर्ची टाकले. मात्र शहरातील सामान्य जनतेला आरोग्याची सुविधा मिळवून देण्यात नेत्यांना आणि प्रशासनाला पूर्णपणे अपयश आल्याचे दिसून येत आहे. दोन वर्षांपासून धूळ खात पडून असणारे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करायला आणखी किती वर्षे लागतील, असा प्रश्न सामान्य नागरिकांतून विचारला जात आहे.

तासगाव शहरातील रुग्णांची गैरसोय होत आहे. आमदार, खासदार याबाबत काहीच बोलायला तयार नाहीत. सामान्य जनतेच्या हिताशी नेत्यांना कोणतेच सोयरसुतक उरलेले नाही. त्यामुळेच हे हॉस्पिटल धूळ खात पडून आहे. केवळ मतांचे राजकारण तासगाव शहरातील जनतेपुढे मांडून नेत्यांचा नाकर्तेपणा घराघरांत पोहोचवला जाईल. हॉस्पिटल सुरू करण्याबाबत महिन्याभरात ठोस निर्णय झाला नाही, तर तासगावच्या जनतेच्या वतीने लढा उभा करू. - शरद शेळके, सामाजिक कार्यकर्ते, तासगाव.

टॅग्स :Sangliसांगलीhospitalहॉस्पिटल