शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गुन्ह्यांच्या तपासाला गती देणार आय बाईक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 15:51 IST

सांगली जिल्ह्यात घडणाऱ्या गुन्ह्यांची उकल जलदगतीने करण्यासाठी व दुर्गम भागात पंचनाम्यासह इतर तांत्रिक तपासासाठी यंत्रणा पोहोचण्यासाठी आता आय बाईकची मदत होणार आहे.

ठळक मुद्देगुन्ह्यांच्या तपासाला गती देणार आय बाईक!जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याहस्ते लोकार्पण

सांगली : जिल्ह्यात घडणाऱ्या गुन्ह्यांची उकल जलदगतीने करण्यासाठी व दुर्गम भागात पंचनाम्यासह इतर तांत्रिक तपासासाठी यंत्रणा पोहोचण्यासाठी आता आय बाईकची मदत होणार आहे.

गंभीर गुन्ह्यातील भौतिक पुरावे तातडीने संकलित करून तपासाला गती देण्यासाठी जिल्हा पोलीस दलात सहा आय (इन्व्हेस्टिगेशन) बाईक दाखल झाल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याहस्ते या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. उपविभागीय स्तरावर असणाऱ्या या दुचाकीसोबत सर्व सुविधा असणार आहेत.विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी जिल्ह्यात असा उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा व अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली आय बाईक कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील दुर्गम भागात गुन्हा घडल्यास तांत्रिक माहितीसाठी पोहोचण्यात अडचणी येत असतात. यावर प्रभावी उपाय म्हणून या उपक्रमाची मदत होणार आहे.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, दुर्गम भागातील गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी या बाईकचा उपयोग होणार आहे. चारचाकी वाहनांपेक्षा लवकर ही बाईक घटनास्थळी पोहोचणार असल्याने पंचनामा व पुराव्यांचे अधिक प्रभावी संकलन होणार आहे. ठराविक कालावधीनंतर संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले म्हणाल्या, सध्या जिल्ह्यात उपविभागीय स्तरावर सहा बाईक कार्यरत राहणार आहेत. उपविभागातील आवश्यकता असलेल्या पोलीस ठाण्यात ही सेवा असेल. बाईकसमवेत दोन प्रशिक्षित कर्मचारी असतील. त्यांच्याकडे स्वतंत्र कीट देण्यात आले आहे. त्याचा उपयोग पंचनामा करण्यात निश्चितपणे होऊ शकेल. यामुळे भविष्यात गुन्ह्याचा तपास लावण्यास गती येईल. रस्ते अपघातातील माहिती संकलनासाठीही याचा उपयोग होणार आहे.यावेळी पोलीस उपअधीक्षक संदीपसिंह गील, संदीप कोळेकर, सहा. पोलीस निरीक्षक जी. व्ही. कांबळे, वाहतूक शाखेचे संजय क्षीरसागर यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेSangliसांगली