शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: मणेराजुरीतील द्राक्ष उत्पादकांना ४७ लाखांचा गंडा, उत्तर प्रदेशचे संशयित पसार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 18:39 IST

सुरुवातीला रोख रक्कम देऊन द्राक्ष उत्पादकांचा विश्वास संपादन केला

तासगाव : मणेराजुरी (ता. तासगाव) येथील द्राक्ष बागायतदारांचा विश्वास मिळवून, त्यांच्याकडून द्राक्ष खरेदी करून, उत्तर प्रदेशमधील तीन व्यापाऱ्यांनी अवघ्या पंधरा दिवसांत २० द्राक्ष उत्पादकांना ४७ लाख रुपयांचा गंडा घातला. हे व्यापारी ‘नॉट रिचेबल’ झाल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी मंगळवारी रात्री पोलिसांत धाव घेतली. दरम्यान, ही द्राक्षे विक्रीसाठी बाजारात नेत असतानाच चार वाहने शेतकऱ्यांनी ताब्यात घेतली.उत्तर प्रदेशमधील तीन व्यापारी द्राक्ष खरेदीसाठी तासगाव परिसरात १५ दिवसांपूर्वी दाखल झाले होते. तासगाव येथील एजंटाला हाताशी धरून त्यांनी आरवडे येथे राहण्यासाठी जागा मिळवली. त्यानंतर मणेराजुरी परिसरात द्राक्ष हंगामाला सुरुवात झाल्यानंतर २३ जानेवारीपासून खरेदीला सुरुवात केली.सुरुवातीला रोख रक्कम देऊन द्राक्ष उत्पादकांचा विश्वास संपादन केला. रोखीने रक्कम मिळत असल्यामुळे मणेराजुरीतील शेतकऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्यांना द्राक्षांची विक्री केली. खरेदी वाढल्यानंतर काही रक्कम देऊन, तांत्रिक कारणे सांगून उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केली. पंधरा दिवसांत २० शेतकऱ्यांची द्राक्ष खरेदी करून, त्यांची ४७ लाख रुपयांची देणी बाकी ठेवली.बुधवारी (दि. १) रात्री संबंधित व्यापाऱ्यांनी आरवडे येथील स्वतःचा बिस्तारा गुंडाळून पोबारा केला. गुरुवार, दि. २ पासून त्यांचा मोबाईल ‘नॉट रिचेबल’ लागत असल्याने या व्यापाऱ्यांनी गंडा घातल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर मंगळवारी (दि. ७) शेतकऱ्यांनी तासगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत तासगाव पोलिस ठाण्यात याबाबत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र, तासगाव येथील एजंटाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.मालेगाव, लखनौजवळ चार वाहनांतील माल ताब्यातफसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर काही शेतकऱ्यांनी तातडीने, ज्या ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या वाहनांतून व्यापाऱ्यांनी द्राक्षे नेली होती, त्या कंपनीशी संपर्क साधून वाटेतच वाहने ताब्यात घेण्याची व्यवस्था केली. त्यानुसार मालेगावजवळ दोन, तर लखनौजवळ दोन वाहनांमधील दहा हजार पेट्या ताब्यात घेऊन विक्री करण्यासाठी यंत्रणा लावली.पोलिसांच्या आवाहनाला केराची टोपलीकाही दिवसांपूर्वी तासगाव पोलिस ठाण्यात व्यापारी, एजंट, शेतकऱ्यांची बैठक घेऊन पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी व्यापाऱ्यांचे ओळखपत्र, बँकेच्या कागदपत्रांची पडताळणी करूनच द्राक्षांची विक्री करण्याबाबत आवाहन केले होते. मात्र, या आवाहनाला उत्पादकांनी केराची टोपली दाखवली. फसवणूक झालेल्या एकाही शेतकऱ्याकडे संबंधित व्यापाऱ्याचे ओळखपत्र किंवा पूर्ण माहिती नसल्याचे निष्पन्न झाले आहे.या शेतकऱ्यांची झाली फसवणूकफसवणूक झालेल्या शेतकऱ्यांमध्ये पांडुरंग महादेव जमदाडे, संतोष बबन जमदाडे, सुभाष रामचंद्र एरंडोले, परशराम वसंत एरंडोले, परशराम धाेंडीराम वाघमारे, शशिकांत शिवाजी कलढाेणे, अनिल बबन चव्हाण, वसंत पंडित लांडगे, रवींद्र नामदेव जमदाडे, गोविंद बाबा भोसले, उदय रघुनाथ भोसले, विजय ऊर्फ कुंडलिक लक्ष्मण लांडगे, रमेश अर्जुन लांडगे, अमोल नारायण माने, प्रकाश तुकाराम कलढोणे, सदाशिव पांडुरंग कलढोणे, विनायक कृष्णराव कांबळे, मौला जलालुद्दीन मुजावर, संदीप हनुमंत बेडगे व राम प्रभाकर पवार यांचा समावेश आहे.

टॅग्स :Sangliसांगली