शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

निर्यातीची द्राक्षे बेदाण्याला

By admin | Updated: April 1, 2015 00:01 IST

कमी दराचा परिणाम : जत तालुक्यातील चित्र

गजानन पाटील - संख -दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान, दावण्या रोगाचा प्रादुर्भाव यासारख्या संकटांना तोंड देत सांभाळलेल्या द्राक्षबागांमधील द्राक्षांच्या काढणीची धांदल जत तालुक्यात सुरू झाली आहे. व्यापाऱ्यांनी अवकाळी पाऊस, बदलत्या हवामानाची कारणे सांगून बाजारात द्राक्षाचा दर पाडला आहे. सध्या द्राक्षाला व्यापारी २५ ते ३0 रुपये किलो असा दर देत आहेत. महागडी औषधे, खते व मशागतीचा खर्च पाहता, हा दर परवडत नसल्याने बेदाणा करण्याकडे कल वाढला आहे. बाजारात विक्री करण्यासाठी उत्पादित केलेल्या द्राक्षांचाही बेदाणा केला जात आहे. त्यामुळे बेदाण्याची शेड हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यातच रब्बी हंगामाची सुगी सुरू झाल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे.तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी फोंड्या माळरानावर द्राक्षबागा उभारल्या आहेत. उमदी, बिळूर, तिकोंडी, संख, करजगी, सिध्दनाथ, जालिहाळ खुर्द, दरीकोणूर, जालिहाळ बुद्रुक, भिवर्गी, डफळापूर, मुचंडी, कोंत्येवबोबलाद, बालगाव, हळ्ळी आदी भागांत द्राक्षबागांचे क्षेत्र अधिक आहे. तालुक्यात ५०६० हेक्टर द्राक्षबागांचे क्षेत्र आहे. गतवर्षी १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती असतानासुध्दा शेतकऱ्यांनी कूपनलिका, विहिरीतील उपलब्ध पाणीसाठा, तसेच टँकरद्वारे बागा जगविल्या होत्या. काही बागांना खोड जगविण्याएवढेही पाणी मिळाले नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांना थोडेफार पाणी होते, त्यांनी बागा महत्प्रयासाने जगवून फळ आणले आहे.आॅक्टोबरच्या १५ तारखेनंतर व शेवटच्या आठवड्यामध्ये छाटणी घेतली जाते. यावर्षी प्रतिकूल हवामान, ढगाळ हवामान, रिमझिम पाऊस यामुळे द्राक्ष बागायतदारांना तारेवरची कसरत करावी लागली. दावण्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. महागडी खते, औषधांचा वापर करुन दावण्या, घड, मणी गळीचा प्रतिबंध केला होता. अनेक अडचणींवर मात करीत द्राक्षबागा चांगल्या आल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी बाजारात थेट विक्री करण्यासाठी उत्पादन घेतले आहे. द्राक्षघड विरळ करण्यासाठी थिनिंग केले आहे. थिनिंगसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. द्राक्षघडातील मण्यांची वाढ चांगली झाली आहे.किमान यंदा तरी द्राक्षांना चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा असताना १ मार्चला अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पाच-सहा दिवस सोडून परत अवकाळी पाऊस झाला. याचाच गैरफायदा घेत व्यापाऱ्यांनी बाजारात दर पाडला आहे. सध्या बाजारात २५ ते ३० रुपये दर मिळत आहे. परंतु सध्या खते, औषधांच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत. मशागतीचा खर्च वाढला आहे. वीजबिल, मजुरीच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारात द्राक्षे विक्रीसाठी नेणे शेतकऱ्यांना परवडत नाही. परिणामी बेदाणा करण्याकडे कल वाढला आहे. सर्वत्र कामे सुरू झाल्यामुळे मजुरांची टंचाई सध्या द्राक्षांची काढणी, बेदाणा वेचणी, पेटी पॅकिंग, वजन करणे आदी कामे मजुरांकरवी केली जात आहेत. दोन महिने मजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. द्राक्ष काढणीस महिलेला २०० रुपये, पुरुषाला ३०० रुपये मजुरी, तर बेदाणा वेचणीला किलोला दोन रुपये मजुरी मिळत आहे. एका दिवसाला एक महिला १७५ ते २०० किलो बेदाणा वेचणी करते. सर्वत्र कामे सुरू झाल्यामुळे मजुरांची टंचाई जाणवत आहे.