शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

जत तालुक्यात कालबाह्य पोषण आहार

By admin | Updated: June 30, 2015 23:21 IST

ठेकेदाराचा प्रताप : बालके, गरोदर स्त्रियांच्या आरोग्याला धोका

गजानन पाटील -संख -महिला व बालकल्याण विभागांतर्गत असलेल्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या जत तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये बालक, गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना कालबाह्य पोषण आहार वाटप करण्यात आला आहे. उत्पादक कंपनीने पोषण आहाराच्या पाकिटावर असलेले बॅच नंबर, उत्पादनाचा दिनांक शाई लावून पुसण्याचा धक्कादायक प्रकार केला आहे. कालबाह्य झालेला पोषण आहार गरोदर स्त्रिया व स्तनदा माता, बालकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणार आहे. या विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.तालुक्यामध्ये मोठ्या अंगणवाड्या ३४५, मिनी अंगणवाड्या ८० आहेत. अंगणवाड्यांमध्ये ० ते ६ वर्षे वयोगटातील १६ हजार ४२९ विद्यार्थी शिकत आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे जत व उमदी प्रकल्प आहेत. अंगणवाडी सेविकांतर्फे गावातील बालक, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता कुपोषित बालकांचा सर्व्हे करण्यात येतो. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पातून सूक्ष्म पोषक तत्त्वांनी समृद्ध केलेला ब्लेंडेड पोषण आहार पाककृती १ व २ असे आहाराचे वाटप केले जाते. ठेकेदाराकडून पोषण आहार पुरविला जातो.तालुक्यातील अंगणवाड्यांना पसायदान महिला संस्था सांगली या उत्पादक युनिटकडून पोषण आहार पुरविला जातो. एका महिन्याचे बालक, गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांना आहार दिला जातो. महिन्यातून पाककृती १ व पाककृती २ असे दोन पिशव्यांचे वाटप केले जाते. त्याचे वजन १८२० ग्रॅम आहे. बालकांना पोषण आहारामध्ये शिरा, उपमा, तर गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना शिरा, सुकडी दिली जाते. प्लॅस्टिक गोण्यांमध्ये २० पाकिटे असतात. पिशव्यांवर बॅच नंबर, उत्पादनाचा दिनांक, उपयोगाचा अंतिम कालावधी नमूद केला आहे. परंतु कालबाह्य झालेल्या पोषण आहारातील पाकिटाच्या बॅच नंबर, उत्पादनाच्या दिनांकावर शाई लावण्यात आली आहे, तर काही पाकिटांवर उत्पादनाची १६ एप्रिल २०१५ ही तारीख आहे. उपयोगाचा अंतिम कालावधी उत्पादन केल्याच्या तारखेपासून ६ महिनेपर्यंत आहे, असा शिक्का आहे. म्हणजेच पाकिटे १६ जूनलाच कालबाह्य झाली आहेत. अंगणवाड्यांना १५ ते २० जूनपर्यंत ती वाटप करण्यात आली आहेत.कालबाह्य पोषण आहारामुळे बालकांच्या शारीरिक विकासावर त्याचा गंभीर परिणाम होतो. गर्भावर परिणाम होतो. स्तनदा मातांच्या आरोग्यावर परिणाम होतो. ठेकेदारांनी पुरविलेल्या पोषण आहाराचा दर्जा तपासला जात नाही. कालबाह्य आहाराची माहिती असूनही त्याचे वाटप झाले आहे. वाटप करताना, आहार कालबाह्य झालेला आहे, जनावरांना खायला घाला, असा मौलिक सल्ला सेविकांना वरिष्ठांनी दिला आहे. म्हणजेच माहिती असूनही ठेकेदाराचे हित जपण्याचा प्रयत्न झाला आहे. कालबाह्य झालेली पोषण आहाराची पाकिटे परत का पाठविली गेली नाहीत?, असा संतप्त सवाल पालकांतून उपस्थित केला जात आहे. या विभागाच्या निष्काळजीपणामुळे तो लवकर वाटप करण्यात आलेला नाही का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. बालके, गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांच्या आरोेग्याशी खेळणाऱ्या या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.बिस्किटेही वादाच्या भोवऱ्यातजत तालुक्यातील अनेक गावांमध्ये पोषण आहाराप्रमाणेच अंगणवाडीतील लहान मुलांना दिली जाणारी बिस्किटेही चांगल्या प्रतवारीची व गुणवत्तेची नाहीत, कमी दर्जाची आहेत, निकृष्ट आहेत. तीही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत.अंगणवाडीतील पोषण आहार कालबाह्य झालेला आहे. याची पंचायत समितीकडे तक्रार केली आहे. चौकशी करण्याचे आश्वासन दिले, पण त्यावर कोणतीही चौकशी झालेली नाही. कालबाह्य पोषण आहार परत घ्यावा, दुसरा द्यावा. - भैरु कांबळे,सामाजिक कार्यकर्ते, दरीबडचीपोषण आहाराबाबत तक्रार आल्यानंतर आम्ही संबंधित आहार पुरविणाऱ्या ठेकेदारांशी पत्रव्यवहार केला आहे. त्याने यापुढे आपल्याकडून अशी चूक होणार नाही, असे लिहून दिले आहे. पोषण आहार कालबाह्य झालेला नाही. तो आजही चालतो.- ए. आर. मडकेसहायक गटविकास अधिकारी