शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समित्यांचे अस्तित्व संपविलेच पाहिजे : मुळीक -- चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 21:47 IST

७३ व्या घटना दुरुस्तीने पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आणली. आज फक्त महाराष्टतच पंचायत समित्या आहेत. - अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक

ठळक मुद्देजिल्हा समितीचे बळकटीकरण आवश्यक

दिलीप मोहिते ।शासनाने तालुका पंचायत समितीचे अधिकार काढून घेऊन अनुदान थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पंचायत समितीचे सभापती, उपसभापती व सदस्यांकडे काहीही अधिकार राहिले नाहीत. हे पदाधिकारी व सदस्य केवळ समारंभात सत्काराचे कारभारी ठरले आहेत. शासनाने घटना दुरुस्तीप्रमाणे घेतलेल्या निर्णयाबाबत पंचायत राज व्यवस्थेचे अभ्यासक अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांच्याशी साधलेला संवाद.

प्रश्न : पंचायत समित्यांचा शासनाकडून अधिकार संकोच होत आहे हे खरे आहे का? यात कितपत तथ्य आहे?उत्तर : आता पंचायत राज व्यवस्थेने केवळ जिल्हा परिषद व ग्रामपंचायत या दोन्हीलाच अधिकार देऊन व्दिस्तरीय व्यवस्था अस्तित्वात आणण्याची शिफारस केली आहे. त्यामुळेच जिल्हा परिषद ते थेट ग्रामपंचायत असा निधी येऊ लागला आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे पंचायत समित्यांचा अधिकार संकोच होण्यात कोणतेही तथ्य नाही.

प्रश्न : पंचायत राज व्यवस्था कालबाह्य झाली आहे का?उत्तर : पूर्वीच्या काळात दळणवळण व्यवस्था नसल्याने विविध प्रकारे आलेल्या शिफारशींनुसार ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद अशी त्रिस्तरीय व्यवस्था अस्तित्वात आणली गेली. आज जनता ग्रामपंचायत ते थेट जिल्हा परिषदेशी संपर्क साधू शकते. त्यामुळे पंचायत समित्यांची गरज राहिली नाही. हे राज्यकर्त्यांना माहिती आहे. परंतु, ‘पोपट मेला’ असे कोणी म्हणायचे? कार्यकर्त्यांना नाराज करण्यापेक्षा अधिकार नसलेले का होईना पण पं.स.चे सदस्यपद दिल्याने कार्यकर्तेही खूष राहतात. आज तालुका पंचायत समित्यांचे अस्तित्व संपविले तरी काहीही अडचण येणार नाही.शासन व्यवस्था सुधारण्यासाठी काय केले पाहिजेजिल्हा नियोजन समितीचे बळकटीकरण करावे, घटना दुरुस्तीप्रमाणे या समितीला शासनाने अधिकार देऊन पारदर्शक काम केले पाहिजे. तसेच या समितीच्या कामात खासदार, आमदार, तसेच अन्य राजकारण्यांचा होणारा हस्तक्षेप पूर्णपणे बंद झाला पाहिजे.थेट लाभार्थी यातील दुवे ?शासन ते लाभार्थी यात प्रस्ताव तयार करून ते तपासण्यासाठी जिल्हा नियोजन समिती पाहिजे. कृषी विभागाचे प्रस्ताव कृषी विभाग स्वीकारते आहे, त्याप्रमाणे जिल्हा परिषदेला घटना दुरुस्तीमुळे मिळालेले सर्व ते अधिकार देऊन जिल्हा नियोजन समिती सक्षम केली पाहिजे. त्यामुळे जनतेची थेट कामे होण्यास मदत होईल.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायत