शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना शाळेत शिकवू द्या..शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली करू नका - रावसाहेब पाटील 

By अशोक डोंबाळे | Updated: January 24, 2024 18:48 IST

जिल्हा प्रशासनासह शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

सांगली : एकीकडे ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रम राबवायचा आणि दुसरीकडे ऐनवेळी शिक्षकांना समाज सर्वेक्षण कामात जुंपून शाळा वाऱ्यावर सोडून द्यायच्या. शासनाच्या या दुटप्पी धोरणामुळे बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे स्वतंत्र यंत्रणेना सर्वेक्षणासह अन्य शासकीय कामे लावावीत. शिक्षकांना शाळाबाह्य कामातून वगळण्यात यावे, अशी मागणी शिक्षण संस्था महामंडळाचे कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी जिल्हा प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.रावसाहेब पाटील म्हणाले, तहसीलदारांनी २० जानेवारीला पत्र काढून २३ जानेवारीला प्रशिक्षणाला उपस्थित राहण्याबाबत शिक्षकांना कळविले आहे. दि. ३१ जानेवारी २०२४ पर्यंत १०० घरांचे ऑनलाइन सर्वेक्षण नोंदी एका शिक्षकाने करण्याचे आहे. आठ दिवसांत हे अशक्य आहे. मुळात कायद्याने हे अशैक्षणिक कामच शिक्षकांना देत येत नाही. या सर्वेक्षणात जी प्रश्नावली आहे, त्या प्रश्नांची उत्तरे लोक देतील का? याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा. काही प्रश्न असे आहेत, की ते विचारल्यावर लोक मारायला शिक्षकांच्या अंगावर येतील. शिक्षकांना कारण नसताना दाढेला देणे योग्य नाही. दहावी व बारावीच्या परीक्षा तोंडावर आहेत. शिष्यवृत्ती परीक्षा तयारी कामकाजही वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्व शिक्षक सर्वेक्षण कामाला लागले तर शाळेत शिकवणार कोण? हा यक्ष प्रश्न आहे. या निर्णयामुळे बहुजन समाजातील मुलांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होणार आहे. शिक्षकांना या कामातून तातडीने मुक्त करून त्यांना शाळेत शिकवू द्या. माझी शाळा, सुंदर शाळा विद्रूप करणारा हा सर्वेक्षणाचा निर्णय शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करणारा आहे. तो तातडीने मागे घ्यावा. अन्य शासकीय यंत्रणेमार्फत हे सर्वेक्षण करून घ्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळातर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. तसेच निवेदनाची एक प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पाठविली आहे.

टॅग्स :SangliसांगलीTeacherशिक्षक