शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळा वाढला गाईच्या दुधाचे दर जैसे थे, आर्थिक कोंडी, शासन बघ्याची भूमिका- तीव्र नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 23:30 IST

देवराष्ट्र: गेल्या नऊ महिन्यांपासून गाईच्या दुधाचे दर घसरल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यावर दुधाचे दर वाढतील,

ठळक मुद्दे उष्णतेने उत्पादन घटू लागले

अतुल जाधव।देवराष्ट्र: गेल्या नऊ महिन्यांपासून गाईच्या दुधाचे दर घसरल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यावर दुधाचे दर वाढतील, अशी शक्यता होती; मात्र ही शक्यता फोल ठरली. गाईच्या दूध दरात वाढ न झाल्याने दूध उत्पादकांत नाराजी आहे.

राज्य शासनाने गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर ३.५ फॅ टसाठी २७ रुपयांचा खरेदी दर जुलै २०१७ पासून लागू केला; पण अनेक दूध संघांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. सहकारी दूध संघांकडून शासनाच्या निर्णयाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. ज्या संघांनी कायद्याच्या भीतीपोटी दरवाढ दिली, त्या दूध संघाच्या संघटनांनी दरवाढ न देण्यासाठी दबाव आणल्याचे चित्र अनेक ठिकाणी निर्माण झाले. या प्रश्नात शासनाने केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे दूध उत्पादकांना आर्थिक फटका बसत आहे.

गेल्यावर्षी शेतकºयांच्या कर्जमाफी आंदोलनावेळी दूध दराचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यावेळी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी गाईच्या ३.५ ते ८.५ फॅटच्या दुधाला प्रतिलिटर २७ रुपये आणि म्हैशीच्या दुधाला ३८ रुपये दर जाहीर केला होता; पण त्यानंतर काही मोजक्या संस्था आणि संघ वगळता अन्य संस्थांनी हा वाढीव दर देण्याबाबत चालढकल केली. दुधाची वाढलेली आवक आणि कमी मागणी, त्यात दूध पावडरचे उत्पादन आणि विक्रीतील अडचणीचे अनेक मुद्दे पुढे करण्यात आले.

सष्टेंबर २०१७ पासून जिल्ह्यातील सर्व दूध संघांनी गाईच्या दुधाचे दर कमी करण्यास सुरुवात केली. काही संघानी तर गाईच्या ३ फॅ ट दुधाला १८ रुपयेपर्यंत कमी दर दिला. उन्हाची तीव्रता वाढल्यावर दुधाचे भाव वाढतील, अशी शेतकºयांना आशा होती; मात्र या आशेलाही आता सुरुंग लागला आहे.उन्हाळ्याचे गणितगेल्या अनेक वर्षांपासून मार्च महिन्यातच दूध दरात वाढ होत होती. पण गेल्या दोन वर्षांपासून दूध दरात वाढ न होता घट होत आहे. आर्थिक कोंडीत सापडलेल्या दूध उत्पादकांना बाहेर काढण्यासाठी शासन व संघ यांनी दरवाढ करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीMONEYपैसा