शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

‘महांकाली साखर कारखाना’ फुकट दिला तरी ‘राजारामबापू’ने घेऊ नये - संजय कोले 

By अशोक डोंबाळे | Updated: October 19, 2023 13:49 IST

सभासदांच्या शेअर्सची रक्कम १५ हजार रुपये करू नये

सांगली : महांकाली सहकारी साखर कारखाना चुकीच्या ठिकाणी उभा केला आहे. तसेच व्यवस्थापनाच्या चुकीमुळे कारखान्यावर कोट्यवधी रुपयांचा कर्जाचा बोजा वाढला आहे. कर्जात बुडालेला महांकाली कारखाना फुकट चालविण्यास दिला तरी राजारामबापू साखर कारखान्याने घेऊ नये, असा सल्ला शेतकरी संघटना सहकार आघाडी प्रमुख संजय कोले यांनी दिला. तसेच कारखान्याने सभासदांच्या शेअर्सची किंमत वाढवून ती १५ हजार रुपये करू नये, असेही त्यांनी सांगितले.राजारामबापू कारखान्याच्या वार्षिक सभेत महांकाली कारखाना चालविण्यास घेण्यासह शेअर्सची किंमत १० हजार रुपयांवरून १५ हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर संजय कोले बोलत होते. ते म्हणाले, मुळात माणगंगा- आटपाडी, डफळे-जत, यशवंत-नागेवाडी, महांकाली हे साखर कारखाने चुकीच्या ठिकाणी उभारले आहेत. जिथे कच्चा माल म्हणजे ऊस पिकण्याची व मिळण्याची शाश्वती नाही. लाखो वर्षे जिथे दुष्काळी परिस्थिती आहे, ज्या भागातील बहुतांश लोक जगण्यासाठी शहर, बागायती पट्ट्यात अथवा सैन्यात गेले आहेत. तत्कालीन पुढाऱ्यांनी राजकारणासाठी चुकीच्या ठिकाणी कारखाने उभारले आहेत. त्यात सभासद, ऊस पुरवठादार शेतकरी, कर्ज पुरवठादार बँका व सरकारचे पैसे बुडाले आहेत. कामगारही देशोधडीला लागले आहेत. अशाच ठिकाणचा महांकाली कारखाना राजारामबापू कारखान्याने फुकट चालवायला दिला तरी तो व्यवस्थापनाने घेऊ नये. कारण, डफळे कारखाना चालवायला घेऊन राजारामबापू कारखान्यास किती तोटा झाला याचा व्यवस्थापनाने अनुभव घेतला आहे. हा अनुभव पाठीशी असताना महांकाली चालविण्यास घेणे, म्हणजे राजारामबापू कारखाना आर्थिक संकटात टाकणारा निर्णय आहे. तसेच तुम्ही कितीही कारखाने चालविण्यास घ्या, पण शेअर्सची किंमत १० हजार रुपयांवरून १५ हजार रुपये करण्याचा निर्णय मागे घेतला पाहिजे. तसेच शेअर्सची किंमत वाढवायची असेल तर शेअर्सची वाढीव रक्कम कारखान्याने भरली पाहिजे.

संपत्ती वाढविण्यावर भरएफआरपी देणे शक्य नाही तर राजारामबापू कारखाना ‘महांकाली’ हे पाचवे युनिट कशासाठी घेत आहेत. उसाला तीन हजार ५०० रुपये दर शेतकऱ्यांना न देता कारखाना व्यवस्थापन संपत्ती वाढवण्याकडे लक्ष देत आहे. राजारामबापू कारखान्यास सर्वाधिक साखर उताऱ्याचा ऊस पुरवठा होत आहे. टनाला १० ते १२ किलो साखर उतारा जास्त आहे. तरीही कारखाना एफआरपीपेक्षा जास्त दर देत नाही हे पूर्णत: चुकीचे आहे, याबद्दल कोले यांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने