शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

अनुदानाची मुदत संपली, आता गाय दूध दरवाढीचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 17:39 IST

पूर्वीप्रमाणे ३२ रुपये दर मिळणार का?

अतुल जाधवदेवराष्ट्रे : गाय दुधासाठी शासनाने ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ साठी प्रतिलिटर २७ रुपये दर देणे बंधनकारक करून पाच रुपये अनुदानाची घोषणा केली. त्यामुळे जिल्ह्यातील गाय दुधाचे दर ३० रुपयांवरून कोसळले व २७ रुपये झाले. आता अनुदानाची मुदत १० फेब्रुवारी रोजी संपली तरी अनुदानाचा पत्ता नाही. त्यामुळे अनुदानापूर्वीचा गाय दूध दर ३२ रुपये आता मिळणार काय ? असा प्रश्न उत्पादकांना पडला आहे.शासनाने ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी अशा ३० दिवसांसाठी गाय दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाची घोषणा केली. या अनुदानासाठी अतिशय किचकट कागदपत्रांची आवश्यकता होती. ऑनलाईन माहिती भरण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी व दूध संकलन चालक यांची धावपळ उडाली. जनावरांना टॅगिंग करणे, आधार कार्ड, बँक खाते सी लिंक करणे, जनावरांच्या टॅगिंगवरून, शेतकऱ्यांचा फार्मर कोड आयडी तयार करून घेणे तसेच दहा दिवसांची दुधाची सरासरी व दूध उत्पादकांची माहिती ऑनलाइन भरणे यासह किचकट प्रक्रिया शासनाने राबवली. यामुळे दूध उत्पादकासह डेअरी चालकांची ससेहोलपट झाली, तरीही दूध उत्पादक शेतकरी व डेअरी चालक यांनी पाच रुपये अनुदानासाठी सर्व काही सहन केले.पण १० फेब्रुवारी रोजी आता अनुदानाची मुदत संपली आहे. शासनाने अजून तरी अनुदानाची मुदत वाढवून दिलेली नाही. त्यामुळे दूध दराचे संकट पुन्हा एकदा दूध उत्पादकासमोर उभे राहिले आहे.

पूर्वीप्रमाणे ३२ रुपये दर मिळणार का?

शासनाने अनुदान देण्यापूर्वी सांगली जिल्ह्यात सरासरी गाय दुधाला ३२ रुपये दर मिळत होता, पण शासनाने अनुदानाची घोषणा केल्यानंतर सर्व दूध संघ चालकांनी गाय दूध दर प्रतिलिटर २७ रुपये केला. अनुदान स्वरूपाने पाच रुपये घेण्याची सर्व शेतकऱ्यांना विनंती केली. आता अनुदानाची मुदत संपली आहे, त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे प्रतिलिटर ३२ रुपये दर मिळणार का? असा प्रश्न जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmilkदूध