शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास कोटी खर्चूनही सांगली पुन्हा खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 16:34 IST

आधी महापूर आणि नंतर झालेल्या मुसळधार पावसाने सांगलीतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. सहा महिन्यांपूर्वीच ५० कोटी रुपये खर्च करून चकचकीत केलेल्या रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतच सांगलीकरांना आपली दिवाळी साजरी करावी लागली. खड्ड्यांमुळे किरकोळ अपघात वाढले आहेत.

ठळक मुद्देपन्नास कोटी खर्चूनही सांगली पुन्हा खड्ड्यातआमराईसमोर रस्त्याची चाळण

सांगली : आधी महापूर आणि नंतर झालेल्या मुसळधार पावसाने सांगलीतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. सहा महिन्यांपूर्वीच ५० कोटी रुपये खर्च करून चकचकीत केलेल्या रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतच सांगलीकरांना आपली दिवाळी साजरी करावी लागली. खड्ड्यांमुळे किरकोळ अपघात वाढले आहेत.वर्षभरापूर्वी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरात रस्त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. सांगलीत आमदार सुधीर गाडगीळ यांनी ३३ कोटी, तर महापालिकेने २४ कोटींचा निधी रस्ते गटारी व इतर सुविधांवर खर्च केला.

याशिवाय नगरसेवकांच्या स्थानिक विकास निधी व महापालिका अर्थसंकल्पातील जनरल फंडातूनही रस्त्यांवर लाखो रुपये खर्च झाले. पण आॅगस्ट महिन्यात महापुरामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे पडले.

महापूर ओसरल्यानंतर शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अगदी दिवाळीतही पावसाचा जोर कायम होता. या पावसामुळे अंतर्गत रस्तेच नव्हे तर, नव्याने केलेले चकचकीत रस्तेही खड्ड्यात गेले.आझाद चौक ते राजवाडा चौक या स्टेशन रोडमार्गे जाणाऱ्या रस्त्याची तर अक्षरश: चाळण झाली आहे. वाहनधारकांना जीव मुठीत धरून जावे लागते. या रस्त्यावर काही दिवसांपूर्वी पॅचवर्क केले; मात्र त्यानंतर झालेल्या पावसाने पॅचवर्कही धुऊन गेले.

राममंदिर- सिव्हिल हॉस्पिटल या रस्त्याची गेल्या सहा महिन्यांपासून दयनीय अवस्था झाली आहे. बसस्थानक ते आंबेडकर रोड या रस्त्यावरही खड्डे पडले आहेत. मुख्य बसस्थानक, झुलेलाल चौकात खड्डेच खड्डे आहेत. पटेल चौक ते कॉलेज कॉर्नर या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. आमराईसमोर रस्त्याची चाळण झाली होती.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSangliसांगली