शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाविरोधात लढायचे कसे?; दुप्पट वेतन देऊनही परिचारिका मिळेनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 19:30 IST

कोविड रुग्णसेवेसाठी मागणी : प्रशिक्षणार्थीही रुग्णसेवेत. जिल्ह्यात कोविड साथीमुळे शासकीय कोविड रुग्णालयासह मिरजेतील खासगी रुग्णालये फुल्ल आहेत.

मिरज : कोरोना साथीच्या काळात परिचारिकांना मागणी असल्याने कोविड हाॅस्पिटलमध्ये प्रशिक्षित परिचारिकांसह, नर्सिंग विद्यार्थ्यांनाही मागणी आहे. खासगी हाॅस्पिटलमध्ये कोविड रुग्णसेवा करणाऱ्यांना दुप्पट वेतन देण्यात येत आहे. तरीही अनेक रुग्णालयांमध्ये टंचाई निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात कोविड साथीमुळे शासकीय कोविड रुग्णालयासह मिरजेतील खासगी रुग्णालये फुल्ल आहेत. कोविड काळात संसर्गाचा धोका असतानाही डाॅक्टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचारी रुग्णसेवा करत आहेत. गतवर्षी कोविड साथीदरम्यान मिरजेतील अनेक रुग्णालयांतील शेकडो परिचारिकांना कोरोना संसर्गाचा सामना करावा लागला होता. कोविड रुग्णसेवेला नकार देणाऱ्या परिचारिकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हेही दाखल केले होते. कोविड काळात उपचारासाठी दाखल रुग्णांची संख्या मोठी असल्याने परिचारकांचे काम महत्त्वाचे ठरले आहे.

खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारकांना कमी वेतनात काम करावे लागते. मात्र, कोविड रुग्णसेवा करणाऱ्या परिचारकांना खासगी रुग्णालयात दुप्पट वेतनासह जेवण व राहण्याची सोय केली आहे. प्रशिक्षित परिचारकांसह प्रशिक्षणार्थी परिचारकांनाही मागणी आहे. नर्सिंग महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थींनाही विविध रुग्णालयांत मागणी आहे. आठवडाभर कुटुंबापासून दूर राहून जीव धोक्यात घालून परिचारिका रुग्णसेवा करत असल्याचे चित्र आहे.

परिचारिकांच्याही कॅम्पस मुलाखती

मिरजेतील सिव्हील, वाॅनलेस, भारती हाॅस्पिटलसह मोठ्या रुग्णालयांमध्ये नर्सिंग पदवी अभ्यासक्रमाची सोय आहे. मिरजेतील परिचर्या महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी मोठ्या शहरातील कार्पोरेट रुग्णालयात काम करत आहेत. गेल्यावर्षापासून मुंबईतील कोकिळाबेन हॉस्पिटलतर्फे मुलाखतीतून पदवीधर परिचारिकांना नोकरी देण्यात आली. अभियांत्रिकी महाविद्यालयात कॅम्पस मुलाखतीद्धारे विद्यार्थांची नोकरीसाठी निवडीची पद्धत आहे. आता काॅर्पोरेट रुग्णालयांकडून मुलाखतीद्धारे परिचारिकांची भरती सुरु झाली आहे. मुंबई, पुण्यातील काॅर्पोरेट रुग्णालयांमध्ये पदवीधर परिचारक विद्यार्थांना मोठी मागणी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस