शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वीस वर्षांपासून लढा तरीही सांगली, आष्टा, संखला तालुक्यांचा दर्जा नाही; राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष  

By अशोक डोंबाळे | Updated: April 25, 2024 17:16 IST

प्रत्येक निवडणुकीत मुद्दा; पण, पुढे काहीच हालचाली नाहीत

अशोक डोंबाळेसांगली : लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये संख, आष्टा आणि सांगली स्वतंत्र तालुक्यांचा मुद्दा चर्चेत असतो. पण, निवडणुका संपल्यानंतर पाच वर्षात खासदार, आमदारांकडून काहीच हालचाली होत नाहीत. नागरिकांच्या प्रश्नांकडे राज्यकर्ते दुर्लक्ष का करत आहेत, असा प्रश्न मतदारांमध्ये चर्चेत आला आहे. गेल्या वीस वर्षांपासून स्वतंत्र तालुक्यासाठी स्थानिक नागरिक लढा देत असूनही तालुक्यांचा दर्जा काही मिळाला नाही.मिरज, वाळवा, जत तालुक्यांचे विभाजन करून सांगली, संख, आष्टा तालुक्यांची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. लोकांची प्रशासकीय गैरसोय टाळण्यासाठी तेथे तूर्त अपर तहसील कार्यालये सुरू करून शासनाने मध्यम मार्ग काढला होता. नव्या तालुक्यांचा निर्णय मात्र प्रत्यक्षात आला नाही. मिरज पश्चिम भागातील लोकांना विविध कामांसाठी मिरज येथे हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे त्यांना गैरसोय सहन करावी लागत आहे. लोकसंख्या, क्षेत्रफळ यांचा विचार करता सांगली स्वतंत्र तालुका होणे गरजेचे आहे.महायुती सरकारच्या काळात आमदार सुधीर गाडगीळ यांनी स्वतंत्र सांगली तालुक्याचा नव्याने प्रस्ताव दिला. त्याचा पाठपुरावा केला. गेल्या वीस वर्षांत स्वतंत्र तालुक्यांची नागरिकांची मागणी असूनही निर्मिती केली गेली नाही. त्याऐवजी अपर तहसील कार्यालय सुरू करून महसूल विभागाचा कारभार चालवला जातो.वाळवा तालुका लोकसंख्येच्या तुलनेत मोठा आहे. वाळवा तालुक्यातून आष्टा स्वतंत्र तालुक्यांची मागणी असूनही याकडे माजी मंत्री जयंत पाटील यांनी फारसे लक्ष दिले नाही. यामुळे आष्टा परिसरातील नागरिकांना इस्लामपूरला कामकाजासाठी जावे लागत आहे.जत तालुका लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही खूप मोठा आहे. जत पूर्व भागातील लोकांची गैरसोय होत असल्यामुळे संख आणि उमदी येथे स्वतंत्र तालुक्यांची मागणी होती. प्रशासनाने मध्यम मार्ग काढत संखला अपर तहसील मंजूर आहे. पण, स्वतंत्र तालुक्याचा प्रश्न आजही प्रलंबितच आहे. नागरिकांची मागणी असूनही त्याकडे खासदार, आमदारांनी का दुर्लक्ष केले, असाही प्रश्न सद्या मतदार उपस्थित करत आहेत.

कर्मचाऱ्यांची संख्या अपूर्णसांगली अपर तहसीलमध्ये मिरज तालुक्यातील सांगली, अंकली, इनामधामणी, सांगलीवाडी, हरिपूर, कर्नाळ, पद्माळे, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, समडोळी, तुंग, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी, कवठेपिरान, मोळा कुंभोज, शेरीकवठे, बुधगाव, कुपवाड, वॉन्लेसवाडी, बामणोली, बिसूर, नांद्रे, वाजेगाव, कावजी खोतवाडी आणि माधवनगर या ३१ गावांचा समावेश आहे. अपर तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, लिपिक, टंकलेखक चार अशी पदे देण्यात आली आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे कारभार ठप्प झाला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४