शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या पूरपट्ट्यातील नागरिकांचे स्थलांतर सुरु, आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी ३० फुटांवर 

By अविनाश कोळी | Updated: July 24, 2024 15:46 IST

पुनर्वसन केंद्रांची सज्ज्जता

सांगली : आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी ३० फुटांवर गेल्यानंतर सांगलीच्या सूर्यवंशी प्लाॅटमध्ये पुराचे पाणी दाखल झाले. याठिकाणच्या १० कुटुंबांचे बुधवारी स्थलांतर करण्यात आले. पाणीपातळीत वाढ झाली तर परिसरातील आणखी काही कुटुंबांचे स्थलांतर करावे लागणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.सांगलीच्या सूर्यवंशी प्लॉटमध्ये मध्यरात्री पाणी दाखल झाले. येथील आठ घरांना पाण्याने वेढले. त्यामुळे महापालिकेच्या सुचनेनुसार काही कुटुंबांनी नातेवाईकांकडे तर काहींनी महापालिकेच्या पुनर्वसन केंद्रात स्थलांतर केले. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने सूर्यवंशी प्लॉटमधील सर्व नागरिकांसह इनामदार प्लॉट, कर्नाळ रोड, शिवमंदिर परिसर, मगरमच्छ कॉलनीतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. घरातील साहित्य सूरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन केले आहे.

पूरपट्ट्यात स्थलांतराची लगबगसांगलीच्या पूरपट्ट्यातील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, कर्नाळ रस्त्यावरील काही नागरिकांनी साहित्य हलविण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी सकाळपासून या भागात स्थलांतरासाठीची पूर्वतयारी सुरु होती.

आयुक्तांकडून मिरजेत पाहणीमहापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी बुधवारी मिरजेच्या कृष्णा घाट परिसरास भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. कृष्णा नदी क्षेत्रात आणि कोयना धरण क्षेत्रात सध्या पावसाचा जोर वाढला असून नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठाच्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

मिरजेची पाणीपातळी ४३ फुटांवरमिरजेत दुपारी दोन वाजता कृष्णेची पाणीपातळी ४३.१ फूट होती. ४५ फूट ही इशारा पातळी आहे. कृष्णा घाट परिसरात नागरिकांनी आपली जनावरे आणि अत्यावश्यक साहित्यासह स्थलांतर व्हावे. प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल. मिरज हायस्कूल येथे निवारा केंद्र सुरू करण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त सजीव ओहोळ, सहायक आयुक्त अनिस मुल्ला, अग्निशमन अधिकारी सुनील माळी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसfloodपूर