शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
3
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
4
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
5
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
6
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
7
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
8
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
9
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
10
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
11
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
12
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
13
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
14
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
15
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
16
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
17
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
18
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
19
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
20
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती

इथिओपियाचा जिफार ‘हिल मॅरेथॉनचा गोविंदा’

By admin | Updated: September 6, 2015 22:16 IST

वेगे वेगे धावू... डोंगरावर जाऊ : निसर्गाच्या संगतीनं धावले हजारो धावपटू; यंदाही पुरुष-महिला गटात परदेशी स्पर्धकांनी मारली बाजी

सातारा/पेट्री : एका बाजूला दहिहंडीची जोरदार तयारी सुरु तर दुसरीकडे भल्या सकाळी सातारच्या रस्त्यावरून धावणारे जगभरातील धावपटू असा अनोखा मेळ रविवारी जुळून आला. सातारा शहरात आयोजित केलेल्या चौथ्या हिल मॅरेथॉन स्पर्धेत यंदा तब्बल पाच हजारहून अधिक स्पर्धक दौडले. यवतेश्वरच्या डोंगरातून नागमोडी घाटातून हिरव्या निसर्गाच्या संगतीने हजारो स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. वेगे वेगे धावून डोंगरावरील इच्छित स्थळी पोहोचून यंदाही परदेशी धावपटूंनी प्रथम तीन क्रमांकावर आपले नाव कोरले अन् इथिओपियाचा धावपटू बिरुक जिफारने सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेची हंडी फोडत सर्वोत्कष्ट गोविंदा ठरला.पोलीस परेड ग्राऊंड ते प्रकृती हेल्थ रिसॉर्ट व पुन्हा पोलीस परेड ग्राऊंड अशी २१ किलोमीटर अंतराची ही स्पर्धा सकाळी सहा वाजता सुरू झाली. खा. उदयनराजे भोसले यांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेस प्रारंभ झाला. ही स्पर्धा तीन विभागांमध्ये घेण्यात आली. तिन्ही स्पर्धेसाठी सुमारे पाच हजार स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी सर्व विभागांनी जय्यत तयारी केली होती. स्पर्धकांना कोणताही अडसर होऊ, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच स्पर्धेदरम्यान स्पर्धकांना कसलाही त्रास होऊ नये यासाठी रुग्णवाहिकाही सज्ज होत्या. स्पर्धा मार्गावर ठिकठिकाणी पाणी, फळांचा रस तसेच प्रथमोपचाराची सोय करण्यात आली होती.स्पर्धेदरम्यान प्लास्टिकचे ग्लास, पाण्याच्या बाटल्या तसेच इतर कचरा नागरिक, कर्मचाऱ्यांनी गोळा करून परिसर स्वच्छ केला. (प्रतिनिधी)टाळ्या वाजवून प्रोत्साहनपोलीस परेड ग्राऊंड येथून सकाळी सहा वाजता हिल मॅरेथॉनला प्रारंभ झाला. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा, तसेच इमारतीच्या छतावर, गॅलरीत उभे राहून साताराकरांनी गर्दी केली होती. बकअप, गो फास्ट, एक्सलंट, कमॉन असे ओरडून स्पर्धकांचा उत्साह वाढविला जात होता तसेच टाळ्या वाजवून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले जात होते. सोशलमीडिया जपून वापरण्याचा संदेशकाही स्पर्धक फलक घेऊन सोशलमीडिया वापराबाबत संदेश देत होते. ‘वापरताना ठेवा भान, व्हॉटस्अ‍ॅप ठरेल वरदान’, चालविताना मोबाईलवर बोलू नये, ‘मोबाईल कानाला, जीव टांगणीला,’ ‘फोर व्हीलरला सीटबेल्ट, तर मग का नाही टू व्हीलरला हेल्मेट,’ असा संदेश दिला जात होता.९६ वर्षांचा तरुण स्पर्धकया स्पर्धेचे वेगळेपण म्हणजे या मॅरेथॉनमध्ये अबालवृद्धांचा सहभाग असतो. यंदा अबापुरी-वर्णे, ता. सातारा येथील ९६ वर्षीय शंकरराव पवार यांनी २१ किलोमीटरची ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. एखाद्या तरुणालाही लाजवेल, असा उत्साह या आजोबांमध्ये दिसून येत होता. ठिकठिकाणी सातारकर टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देत होते. मात्र माजी सैनिक असणाऱ्या पवार यांना खेळाची प्रचंड आवड आहे. त्यामुळे निवृत्तीनंतरही ते विविध खेळांमध्ये हिरीरीने सहभागी होतात तर एका अंध आजोबांनी आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. यशाचे मानकरी...सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेत यंदाही परदेशी धावपटूंनी बाजी मारत प्रथम तीन क्रमांक पटकावले. विशेष म्हणजे तिन्ही स्पर्धक हे इथोपियाचे आहेत. यातील बिरुक जिफारने १ तास ७ मिनिटे आणि ४७ सेकंदात २१ किलोमीटरचे अंतर पार करून प्रथम क्रमांकाच्या दीड लाख रुपयांच्या पारितोषिकाचा मानकरी ठरला. टॅमरॅट गुडेटा, गुडिसा डिबेले यांनी द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे पटकावली. भारतीय स्पर्धकांमध्ये दीपक कुंभार याने १ तास १२ मिनिटे आणि १ सेकंदात तर महिला गटात नीलम रजपूतने १ तास १४ मिनिटे १५ सेकंदात हे अंतर पार केले. स्पर्धकांसंगे आमदारही दौडले...सातारा हिल मॅरेथॉनमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सहभाग घेऊन २१ किलोमीटरची दौड पूर्ण केली. या स्पर्धेत वेदांतिकाराजे भोसले, नगराध्यक्ष सचिन सारस, उपविभागीय परिवहन अधिकारी संजय राऊत, जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी सहभाग घेतला.स्पर्धकांच्या संख्येत वाढगेल्या वर्षी सातारा हिल मॅरेथॉनमध्ये देश-विदेशातील सुमारे २१०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यंदाच्या स्पर्धेत तब्बल २७१३ स्पर्धकांनी घाटातील स्पर्धेचा थरार अनुभवला.