शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

‘भ्रूणहत्या’ रोखण्यासाठी पहिली आंतरराज्यस्तरीय समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 21:40 IST

सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील भारती हॉस्पिटल सांगलीतील चौगुले हॉस्पिटल मधील घडलेल्या गर्भपात प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला ...

ठळक मुद्देजिल्हा शल्य चिकित्सकांचा समावेश : गर्भपात करणाऱ्या डॉक्टर ‘वॉच’ राहणार

सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील भारती हॉस्पिटलसांगलीतील चौगुले हॉस्पिटल मधील घडलेल्या गर्भपात प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. याची गंभीर दखल घेऊन स्त्री भ्रृणहत्या रोखण्यासाठी पहिली आंतरराज्यस्तरीय संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. स्त्री रोग तज्ञ, सोनोग्राफी केंद्र आणि गर्भपात करणाºया डॉक्टरवर आणि रुग्णलयावर ही समिती नियंत्रण ठेवणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील जिल्हा शल्य चिकित्सक समकक्ष समूचित प्राधिकारी यांचा या संयुक्त समितीत समावेश आहे.

मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती प्रवीण जमदाडे या महिलेचा गर्भपात करताना मृत्यु झाला होता. दोन मुली नंतर, तिसरी पण मुलगीच असल्याने तिचे पती प्रवीण यांनी तिलागर्भपात करण्यासाठी म्हैशाळमध्ये नेले होते. डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे यांच्या भारती रुग्णालयात गर्भपात करताना तिचा मृत्यु झाला होता. पोलिसांच्या तपासात डॉ. खिद्रापुरे यांने अनेक महिलांचे बेकायदा गर्भपात करुन भ्रूणहत्या केल्यचे उघडकीस आले होते. डॉ. खिद्रापुरे हा हे भ्रूण जमिनीत दफन करीत होता. म्हैशाळ ओढ्यालगत पोलिसांनी खोदकाम केल्यानंतर दफन केलेले १९ भ्रूण सापडले होते. याप्रकरणी मुख्य संशयित डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेसह १३ संशयितांना अटक करण्यात आली होती.

कर्नाटकातील कागवाडमध्ये गर्भलिंग चाचणी करणे आणि पुढे डॉ. खिद्रापुरेच्या रुग्णालयात गर्भपात करणारे ‘रॅकेट’च पोलिसांनी उजेडात आणले होते.सांगलीत चार महिन्यापूर्वी चौगले मॅटर्निटी अ‍ॅण्ड सर्जीकल हॉस्पिटलमध्ये बेकायदा गर्भपाताचे प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणी डॉ. रुपाली चौगुले आणि डॉ. विजयकुमार चौगुले यांना अटक केली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. हे दाम्पत्य शासकीय सेवेत कार्यरत होते, त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.आॅनलाईन माहितीस्त्री भ्रृणहत्या रोखण्यासाठी पहिली आंतरराज्यीय संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व गर्भलिंगनिदान तंत्र अधिनियम कायद्यांतर्गत ही समिती कार्यरत असणार आहे. जिल्'ातील पीसीपीएनडीटी कायद्यात येणाºयाया सर्व स्त्री रोग तज्ज्ञ, सोनोग्राफी केंद्रांची माहिती एकत्र करण्याच्या दृष्टीने संगणकीय आज्ञावली (सॉफ्टवेअर) निर्माण केली जात आहे. यामुळे जिल्'ातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांची माहिती एका दृष्टीक्षेपात आॅनलाईन मिळू शकणार आहे.

 

टॅग्स :Sangliसांगलीhospitalहॉस्पिटल