शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण दिन विशेष: चांदोली धरणाच्या १५० एकरावरील प्रस्तावित पर्यटन केंद्राचा प्रस्ताव धूळखात

By संतोष भिसे | Updated: June 5, 2025 18:36 IST

प्रशासनाची मानसिकता नाही, जमिनीवर अतिक्रमणे वाढू लागली

संतोष भिसेसांगली : चांदोली धरणाच्या उभारणीनंतर अजूनही सुमारे १५० एकर जमीन वापराविना शिल्लक आहे. ती पर्यटनदृष्ट्या विकसित करावी यासाठी लोकप्रतिनिधी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र, सरकारी कार्यालयांच्या लालफितीच्या कारभारामुळे प्रस्तावाची फाइल बासनात गुंडाळली गेली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात दोन वेळा बैठका घेऊनही प्रशासन कार्यवाहीच्या मानसिकतेत नाही. शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी मात्र प्रस्तावाचा पिच्छा अद्याप पुरवला आहे. १९७८ मध्ये धरणाची उभारणी पूर्ण झाली. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जमिनीचे संपादन केले होते. काही गावे विस्थापितही केली. धरणाची उभारणी पूर्ण झाल्यानंतर काही जागेत कर्मचारी वसाहत, कार्यालये, विश्रामगृह उभारण्यात आले. त्यानंतरही १५० एकर जमीन शिल्लक आहे. त्यातील काही जागेत आता अतिक्रमणे होऊ लागली आहेत.

चांदोलीमध्ये फुलपाखरू उद्यान, मगर उद्यान आणि बरेच काहीचांदोली धरण परिसरात फुलपाखरू उद्यान, मधुमक्षिकापालन केंद्र, आकर्षक उद्यान, निरीक्षण मनोरा, रोषणाई, लेसर शो, उपाहारगृह आदी सोयी- सुविधा पर्यटनदृष्ट्या करणे शक्य आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवलेल्या प्रस्तावात यासह विविध प्रकारच्या २१ पर्यटन प्रकल्पांचा उल्लेख आहे; पण हा प्रस्ताव धूळखात पडला आहे.

क्रोक्रोडाइल पार्कचा ड्रीम प्रोजेक्टआमदार जयंत पाटील यांनी जलसंपदामंत्री असताना चांदोलीमध्ये क्रोकोडाइल पार्कची थीम मांडली होती. भिलवडी ते सांगलीदरम्यान कृष्णा नदीत मोठ्या संख्येने पैदास झालेल्या काही मगरी चांदोलीमध्ये पाठवायच्या व तेथे क्रोकोडाइल पार्क विकसित करायचे, अशी ही संकल्पना होती; पण ती कागदावरही आली नाही. जयंत पाटील सत्तेतून पायउतार झाले आणि प्रशासनानेही त्यांच्या संकल्पनेला जणू काही एक प्रकारे मूठमातीच दिली.

यांची संयुक्त जबाबदारीचांदोली धरण व परिसरात वन विभाग, महानिर्मिती, पाटबंधारे, पर्यटन यासह महसूल प्रशासनाच्या विविध माध्यमांतून कामकाज चालते. पर्यटनदृष्ट्या हा परिसर विकसित करण्यात या सर्व विभागांचा संयुक्त सहभाग महत्त्वाचा आहे; पण या विभागांनी त्यादृष्टीने कधीही विचार केल्याचे दिसत नाही.

चांदोली पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत दोन वेळा बैठका झाल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातही पाठपुरावा केला. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी गट विकास अधिकाऱ्यांना बैठकीला पाठवून औपचारिकता पूर्ण केली; पण येथे पर्यटन केंद्र निर्माण करण्याची प्रामाणिक मानसिकता जिल्हा प्रशासनात नाही. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत. -शिवाजीराव नाईक, माजी आमदार, शिराळा

टॅग्स :Sangliसांगलीenvironmentपर्यावरणtourismपर्यटन