शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

संपूर्ण जिल्हाभर सीसीटीव्ही कॅमेरे लावणार

By admin | Updated: April 22, 2017 00:33 IST

विश्वास नांगरे-पाटील : अपघात करणाऱ्या नशेबाजांवर आता सदोष मनुष्यवधाचे गुन्हे

सांगली : वाढत्या गुन्ह्यांना आळा बसावा, सामान्य माणूस सुरक्षित राहावा, यासाठी संपूर्ण सांगली जिल्ह्यात लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील, अशी ग्वाही कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली. दारुच्या नशेत अपघात करणाऱ्या नशेबाज वाहनचालकांविरुद्ध यापुढे सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही त्यांनी दिला. जिल्ह्यातील सर्व वायरलेस, वाहतूक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ व ‘पॉस’ यंत्राचे वाटप नांगरे-पाटील यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील टिळक सभागृहात शुक्रवारी दुपारी हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी उपस्थित होते. नांगरे-पाटील म्हणाले की, कोल्हापूर परिक्षेत्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर ग्रामीण व पुणे ग्रामीण या पाच जिल्ह्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव आहे. कोल्हापुरात हा प्रयोग केला असून, तो यशस्वीही झाला आहे. याच धर्तीवर अन्य चार जिल्ह्यात ते बसविण्याचे नियोजन सुरु आहे. कोल्हापुरात अडीचशे सीसीटीव्ही कॅमेर बसविले. त्याचा परिणाम चांगला झाला. महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारुन लंपास करणे, प्रवाशांच्या बॅगा लंपास करणे, बँक ग्राहकांना लुटणे, पाकीटमारी या गुन्ह्यांना आळा बसला आहे. गुन्ह्यांना प्रतिबंध व घडलेल्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी कॅमेऱ्यांची मोठी मदत मिळेल. सांगलीत सध्या केवळ १८ कॅमेरे आहेत. त्यांचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. जिल्हा नियोजन समिती, महापालिका, नगरपालिका व लोकसहभागातून कॅमेऱ्यांसाठी निधी जमा केला जाईल. येत्या काही महिन्यात चांगल्या दर्जाचे कॅमेरे जिल्हाभर लावले जातील. नांगरे-पाटील म्हणाले, कोल्हापूर परिक्षेत्रात दररोज दहा लोकांचा अपघाती मृत्यू होतो. अपघातात बळी जाणाऱ्याच्या कुटुंबाची वाताहत होते. अपघात करणारा दुसऱ्यादिवशी जामिनावर बाहेर येतो. यासाठी आता जिल्ह्यातील सर्व पोलिसांना ‘बे्रथ अ‍ॅनालायझर’ यंत्राचे वाटप केले. या यंत्राच्या मदतीने नशेबाज वाहनचालकांची तपासणी करणे सोपे होणार आहे. अपघात करुन बळी घेणाऱ्या वाहनचालकांच्या रक्ताचे नमुने तपासले जातील. मोठ्या प्रमाणात दारूचे अथवा अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)मला ओव्हरटेक करून पुढे...नांगरे-पाटील म्हणाले की, चार दिवसांपूर्वी मी कोडोली (ता. पन्हाळा) येथून कोल्हापूरला येत होतो. त्यावेळी पंधरा ते सोळा वयोगटातील तीन तरुण दुचाकीवरुन ‘ट्रीपलसीट’ बसून निघाले होते. ते माझ्या मोटारीला ओव्हरटेक करून पुढे गेले. माझ्या ताफ्यातील पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. मी या तरुणांकडे, तुम्ही ‘ट्रीपलसीट’ बसून कुठे निघाला आहात?’, अशी विचारणा केली. त्यावर या तरुणांनी, आम्हाला निर्भया पथकाने पकडले होते व समुपदेशनासाठी पोलिस ठाण्यात बोलाविले आहे, असे सांगितले. या तरुणांकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. दुचाकीची कागदपत्रेही नव्हती. नंबरप्लेटही नव्हती. शेवटी या तरुणांच्या पालकांना मी स्वत: कार्यालयात बोलावून ताकीद दिली. तसेच त्यांच्यावर कारवाईही केली.