शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2019 : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रबोधन, मॅरेथॉन स्पर्धा, सायकल रॅलीसह इतर उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 14:16 IST

निवडणुकांमध्ये घसरत चाललेला मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाने स्पीप कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वाढलेली टक्केवारी लक्षात घेता, हा उपक्रम प्रभावी ठरत आहे. या निवडणुकीत किमान ७५ टक्क्यांपर्यंत मतदान जाण्यासाठी प्रशासनाने प्रबोधनाची तयारी केली आहे. मॅरेथॉन स्पर्धा, सायकल रॅलीसह इतर मतदारांना प्रभावित करणारे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

ठळक मुद्देमतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रबोधनमॅरेथॉन स्पर्धा, सायकल रॅलीसह मतदारांना प्रभावित करणारे उपक्रम

सांगली : निवडणुकांमध्ये घसरत चाललेला मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाने स्पीप कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वाढलेली टक्केवारी लक्षात घेता, हा उपक्रम प्रभावी ठरत आहे. या निवडणुकीत किमान ७५ टक्क्यांपर्यंत मतदान जाण्यासाठी प्रशासनाने प्रबोधनाची तयारी केली आहे. मॅरेथॉन स्पर्धा, सायकल रॅलीसह इतर मतदारांना प्रभावित करणारे उपक्रम राबविण्यात येत आहेत.मतदानाचा दिवस म्हणजे सुटी हा समज अनेकांमध्ये असतो. यावर पर्याय म्हणून निवडणूक आयोगाने मतदान रविवारी न घेता अन्य दिवशी घेण्यास सुरुवात केली. तरीही अनेकवेळा घसरत चाललेला मतदानाचा टक्का चिंतेचा विषय ठरला होता. मात्र, थेट मतदारांपर्यंत पोहोचत लोकशाही बळकटीकरणात एक मत किती महत्त्वाचे आहे, हे सांगण्यासाठी स्वीप (सिस्टीमॅटिक व्होटर एनरोल्मेंट अ‍ॅण्ड एज्युकेशन प्रोग्रॅम) उपक्रम राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत आणि महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.चार स्तरावर होत असलेल्या या प्रक्रियेत पहिल्या टप्प्यात मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट यंत्रणेची मतदारांना माहिती देण्यात येत आहे. त्याचबरोबरच प्रत्येक मतदान केंद्रावर चुनावी पाठशाला उपक्रमात मतदारांच्या शंकांचे निरसन करत त्यांचे मतदान यादीतील नाव, भाग याची माहिती देण्यात येत आहे. प्रत्येक तहसील कार्यालयात मतदार सहाय केंद्र, तर प्रत्येक शासकीय कार्यालयात मतदार जागृती फोरम सुरू करण्यात आला आहे.दुसऱ्या प्रकारात शहरातील ज्या भागात नेहमीच कमी मतदान होते, त्याठिकाणी जागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक गलाई बांधव व्यवसायासाठी देशभर वास्तव्यास आहेत. त्यांनी मतदान करावे यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. तरुण मतदारांनीही मतदान करावे, यासाठी कॉलेजमध्ये उपक्रम सुरू करण्यात येत असून, प्रत्येक  कॅम्पस अ‍ॅम्बेसिडर कार्यरत आहेत. शहरातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी गृहनिर्माण सोसायटीमध्ये बैठक, मुलांकडून पत्रलेखन उपक्रम राबविण्यात येत आहेत.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाSangliसांगलीVotingमतदान