शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: कंत्राटी वीज कामगारांच्या संपामुळे वीजपुरवठा विस्कळीत, ५ मार्चपासून बेमुदत काम बंद

By अशोक डोंबाळे | Updated: February 29, 2024 17:54 IST

सांगलीत महावितरण कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांची निदर्शने

सांगली : कंत्राटी वीज कामगारांच्या संयुक्त कृती समितीने कामगारांच्या मागण्यांसाठी दि. २८ फेब्रुवारीपासून दोन दिवस संपावर गेले आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्ह्यातील वीज यंत्रणा सलाइनवर आहे. सांगली, मिरज शहरांतील कर्मचाऱ्यांनी विश्रामबाग येथील महावितरणच्या कार्यालयासमोर निदर्शने करून धरणे आंदोलन केले; तसेच शासनाने आंदोलनावर तोडगा काढला नाही तर ५ मार्चपासून बेमुदत काम बंदची हाक दिली आहे.वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कॉ. महेश जोतराव, वर्कस कंत्राटी फेडरेशन कामगार सेल राज्य सचिव दत्ता पाटील, मागासवर्गीय कामगार संघटनेचे ढोमके, कंत्राटी कामगार महासंघाचे गणेश पाटील, मागासवर्गीय कंत्राटी कामगार संघटनेचे विशाल कोळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी महावितरणच्या विश्रामबाग कार्यालयासमोर निदर्शने करून दिवसभर धरणे आंदोलन केले. महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांतील कंत्राटी कामगारांनी पहिल्या टप्प्यात २८ फेब्रुवारीपासून ४८ तास व दुसऱ्या टप्प्यात ५ मार्चपासून बेमुदत काम बंदची नोटीस तिन्ही कंपनी प्रशासनाला दिली होती. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तिन्ही कंपनी व वीज कंत्राटी कामगारांच्या संयुक्त कृती समितीची बैठक झाली. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्यामुळे जिल्ह्यातील सर्व कंत्राटी वीज कर्मचारी मंगळवारीपासून संपावर गेले होते. गुरुवारी सायंकाळी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन कामावर हजर झाले आहेत; पण तिन्ही वीज कंपनीच्या प्रशासनाने कंत्राटी वीज कामगारांच्या प्रश्नाबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर ५ मार्च २०२४ पासून बेमुदत काम बंदची हाक आंदोलकांनी दिली आहे.

वीज कंपन्यांतील कंत्राटी कामगारांच्या मागण्या

  • तिन्ही वीज कंपन्यांतील रिक्त पदांवर कंत्राटी कामगारांना सामावून घ्या.
  • कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत तेथे नियमित पदभरती करू नका.
  • कंत्राटी कामगारांच्या एकूण पगारात १ एप्रिलपासून ३० टक्के वाढ करा.
  • मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफरशींची तातडीने अंमलबजावणी करा.
  • कंत्राटी कामगारांना वयाच्या ६० वर्षापर्यंत कंत्राटदारविरहित शाश्वत रोजगार द्या.
  • कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायीप्रमाणे ‘समान काम, समान वेतन’ द्या.
टॅग्स :Sangliसांगलीmahavitaranमहावितरणagitationआंदोलन