शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणार अडीच पगार बक्षीस, तीन पगारांच्या मागणीवर कर्मचारी ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 13:01 IST

जिल्हा बँकेच्या आर्थिक प्रगतीत बँकेच्या कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान

सांगली : जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी दोन पगार बक्षीस दिला जातो, यात यंदा अर्ध्या पगाराची भर पडली आहे. यावेळी अडीच पगार बक्षीस देण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी नफ्यामध्ये तरतूद केली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांचा याला विरोध आहे. कर्मचाऱ्यांनी चार पगारांची मागणी केली होती. किमान तीन पगार तरी मिळावेत यासाठी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी बँकेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटणार आहेत.जिल्हा बँकेच्या आर्थिक प्रगतीत बँकेच्या कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे. ग्राहकांना दैनंदिन सेवा देण्याबरोबच ठेव वाढ व कर्जवसुलीचेही कर्मचाऱ्यांना उदिष्ट दिले जाते. प्रतिकर्मचारी व्यवसाय वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला जातो. दरवर्षी बँकेचा नफा जाहीर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना दोन पगार बक्षीस म्हणून जाहीर केले जातात. यातील एक पगार मे-जूनमध्ये दिला जातो तर दूसरा पगार बोनस म्हणून दिवाळीवेळी मिळतो. मागील काही वर्षांपासून जिल्हा बँकेने सव्वाशे कोटींंवर नफा मिळवण्यास सुरवात केली आहे. त्यात कर्मचाऱ्यांच्या वसुलीचेही मोठे योगदान आहे. त्यामुळे दरवर्षी कर्मचारी संघटना तीन ते चार पगार बक्षीस देण्याची मागणी करतात पण संचालक मंडळ ती मान्य करत नाही. कोल्हापूर जिल्हा बँक कर्मचाऱ्यांना दोन पगार बक्षीस व दोन पगार बोनस देते. सांगली जिल्हा बँकेनेही याची अंमलबजावणी करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.कर्मचाऱ्यांचे हे योगदान अध्यक्ष व सीईओंनही मान्य केले. त्यामुळे यंदा तरी कर्मचाऱ्यांना तीन ते चार पगार बक्षीस मिळतील अशी आशा होती तशी मागणी कर्मचारी संघटनेच्यावतीने अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक व सीईओ शिवाजीराव वाघ यांच्याकडे केली होती. पण ही मागणी धुडकावत अडीच पगार बक्षीस देण्याचा निर्णय घेण्यात आला. केवळ अर्धा पगार वाढवण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांत मोठी नाराजी असून किमान तीन पगार मिळावेत, अशी मागणी कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात येणार आहे.

जिल्हा बँकेला १३४ कोटींचा नफाजिल्हा बँकेने यंदा मार्च २०२३ अखेर १३४ कोटींचा ढोबळ नफा मिळविला आहे. मात्र, यंदा बिगर शेती संस्थांकडून कर्जवसुलीस फारसे सहकार्य मिळाले नाही. शेती कर्जाची मात्र जोमात वसुली झाली. ही वसुली करण्यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी मोठे योगदान दिले. प्रसंगी थकबाकीदार शेतकऱ्यांच्या बांधावर जावून वसुलीसाठी प्रयत्न केले.

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक