शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
2
बारामतीतील EVM स्ट्राँगरुमचे CCTV अचानक बंद झाल्याचा सुळेंचा आरोप; निवडणूक अधिकारी म्हणाले...
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
4
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
5
शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उबाठा संपवली; मनसेचा जोरदार पलटवार
6
रोहित वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकतो; युवीच्या वडिलांचा दावा, BCCI ला दिला खास सल्ला
7
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
8
Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं
9
'बजरंगी भाईजान'च्या मुन्नीने केलं आलमजेबला कॉपी; 'एक बार देख लिजिए'वर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स
10
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
11
गुरु-केतु नवमपंचम योग: ३ राशींना दिलासा, ३ राशींनी अखंड सावध राहावे; नेमके काय करु नये?
12
सावनी रविंद्रनंतर सुयश टिळकलाही बजावता आला नाही मतदानाचा हक्क, म्हणाला - "ह्याची खंत वाटते..."
13
पोलीस कॉन्स्टेबल वराला प्रेयसीने भर मंडपातून पळवले, दुसऱ्या तरुणीशी विवाह होण्यापूर्वी रंगला ड्रामा
14
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
15
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
16
PAK vs IRE: पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली; आयर्लंडची कडवी झुंज!
17
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
18
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
19
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
20
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा

Sangli News: कवठेमहांकाळमधील १० गावांचा पथकर मुक्तीसाठी एल्गार

By संतोष भिसे | Published: June 09, 2023 6:01 PM

रत्नागिरी - नागपूर महामार्गावर बोरगाव पथकर नाक्याजवळच्या गावांना सध्या पास काढून प्रवास करावा लागतो.

सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील दहा गावांनी पथकर मुक्तीसाठी एल्गार पुकारला आहे. बोरगाव पथकर नाक्यापासून १० किलोमीटरच्या परिघातील गावांना पथकरातून सूट देण्याची मागणी पथकर मुक्ती कृती समितीने केली आहे.रत्नागिरी - नागपूर महामार्गावर बोरगाव पथकर नाक्याजवळच्या गावांना सध्या पास काढून प्रवास करावा लागतो. व्यावसायिक नसलेल्या छोट्या चारचाकी वाहनांना महिन्याला ३३० रुपयांचा पास घ्यावा लागतो. शेतीसाठीचे ट्रॅक्टर्स, प्रवासी वाहतूक करणारी वडाप वाहने यासह अन्य  व्यावसायिक वाहनांना नियमाप्रमाणे पूर्ण पथकर द्यावा लागतो. नाक्यापलीकडे शेती असलेल्या एखाद्या शेतकऱ्याला शेतात खत टाकायचे असले, तरी पथकर भरुन पलीकडे जावे लागते. तासाभरात काम संपवून परतायचे असेल, तर दुहेरी पथकराची पावती फाडावी लागते. त्यासाठी फास्टॅग काढावा लागतो. तो नसेल, तर दंडासह पथकराची आकारणी होते.दैनंदिन कामानिमित्त दररोज पथकर नाक्यावरुन ये-जा करणाऱ्यांसाठी ही डोकेदुखीची बाब ठरली आहे. नाका उभारतानाच त्याला ग्रामस्थांनी विरोध  केला होता. अन्यत्र उभारण्याची मागणी केली होती. त्यांचा विरोध डावलून नाका उभारला गेला. सातारा, पुणे जिल्ह्यांतील नाक्यानजिकच्या गावांनी संघर्ष करुन पथकर मुक्ती मिळविली आहे. काही ठिकाणी कागदोपत्री पथकर लागू असला, तरी स्थानिक दबावामुळे वसुली होत नाही. स्थानिक क्रमांक पाहून वाहन सोडले जाते. बोरगाव नाक्यावर मात्र तशी स्थिती नसून सक्तीने वसुली होते.सोमवारी शिरढोणमध्ये बैठकयाला विरोधासाठी कृती समितीने सोमवारी (दि. १२) शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथे शेतकरी व ग्रामस्थांची बैठक आयोजित केली आहे. पथकर मुक्तीसाठी आंदोलनाची दिशा यावेळी निश्चित केली जाईल. यावेळी कृती समितीतर्फे दिगंबर कांबळे, अवीराजे देशमुख, सचिन करगणीकर, बाळासाहेब रास्ते, अरुण भोसले, अनिल परीट, दिगंबर भोसले आदी भूमिका मांडणार आहेत.

या गावांना बसतो भुर्दंडपथकर नाक्याच्या १० किलोमीटरच्या परिघात असलेल्या बोरगाव, गव्हाण, जायगव्हाण, देशिंग, नृसिंहगाव, कुची, हरोली, मळणगाव, अलकूड आदी गावांना पथकराचा भुर्दंड बसत आहे. गेल्या १० महिन्यांपासून पथकराचा जाच सोसत आहेत. दरवर्षी त्यामध्ये वाढ होते.

टॅग्स :Sangliसांगलीtollplazaटोलनाका