शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचारी २५ सप्टेंबरपासून दोन दिवस संपावर, राज्य शासनाला दिली संपाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 16:59 IST

पेन्शन, वीज कंपन्यांचे खाजगीकरण विरोधात सर्व संघटना आक्रमक

सांगली : वीज क्षेत्रातील खाजगीकरण आणि पेन्शनसह विविध मागण्यांसाठी महानिर्मिती, महापारेषण, महावितरण कंपन्यांमधील सर्वच कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि कंत्राटी वीज कामगार दि. २५ ते २६ सप्टेंबर २०२४ रोजी ४८ तासांच्या संपावर जाणार आहेत. या संपामध्ये १०० टक्के यशस्वी करण्याचा तीन्ही कंपन्यांमधील कर्मचारी संघटनांनी निर्णय घेतला आहे.महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीतर्फे राज्य शासनाला संपाची नोटीस दिली आहे. या निवेदनात म्हटले की, वीज वितरणाचा परवाना व वीज कंपन्यांच्या खाजगीकरण बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी फडणवीस यांनी वीज कंपन्यांचे खाजगीकरण करणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्यानंतरही वीज कंपन्यांमध्ये खाजगीकरण सुरुच आहे. १६ जलविद्युत निर्मिती केंद्रे सर्वात कमी खर्चात वीज निर्मिती करत आहेत. त्या संचाचे आधुनिकरण व नूतनीकरणाच्या नावाखाली खासगी भांडवलदारांच्या ताब्यात देण्याचा कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महापारेषण कंपनीच्या व्यवस्थापनाने २०० कोटी वरील प्रकल्प खासगी उद्योजकांना उभारणी, चालवणे व देखभाल-दुरूस्तीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. या खासगीकरणाला कर्मचारी, अभियंते, अधिकाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे तीन वीज कंपन्यांमधील कर्मचारी, अभियंते, अधिकाऱ्यांनाही सुधारित पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी आहे. वीज कंपन्यांमधील रिक्त जागा त्वरित भरावेत, अशीही मागणी आहे. या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी २५ व २६ सप्टेंबरला वीज कर्मचारी संपावर गेले आहेत.

मीटरसाठी शंभर टक्के अनुदान द्याकेंद्र सरकारने सर्व राज्यांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावणे बंधनकारक केले आहे. मीटर लावण्याकरिता केंद्र सरकारने केवळ प्रतिमीटर ९०० रुपये अनुदान दिले आहे. स्मार्ट प्रीपेड मीटरची निविदा मंजूर असून त्या कंपनीने एका स्मार्ट प्रीपेड मीटरची किंमत १२ हजार निश्चित केली आहे. महावितरण कंपनी आर्थिक अडचणीत आहे. शासनाच्या या निर्णयामुळे पुन्हा कोट्यवधी रुपयांचा बोजा महावितरण कंपनीला बसणार आहे. म्हणून केंद्र शासनाने १०० टक्के मीटरसाठी अनुदान द्यावे, अशी मागणी एम.एस.ई. वर्कर्स फेडरेशनचे अतिरिक्त सरचिटणीस महेश जोतराव यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीelectricityवीजmahavitaranमहावितरणStrikeसंप