शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

सांगली जिल्हा बँकेच्या निवडी; काँग्रेसचे सर्वाधिकार विश्वजित कदमांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2021 11:43 IST

जिल्हा बँकेचे उपाध्यक्षपद काँग्रेसकडे जाणार. सत्ताधारी सहकार पॅनलमध्ये राष्ट्रवादीचे ९ संचालक असून, अध्यक्षपदावर त्यांचा दावा आहे.

सांगली : जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष निवडीबाबत काँग्रेसचे सर्वाधिकार सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना दिले आहेत, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली. उपाध्यक्ष पदासाठी जयश्रीताई मदन पाटील यांचे नाव जवळपास निश्चित असल्याची चर्चा आहे. मात्र, डॉ. कदम काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना यांच्या महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलने २१पैकी १७ जागांवर विजय मिळवत सत्ता मिळवली. विरोधी भाजपप्रणित शेतकरी विकास पॅनलने चार जागी विजय मिळवत स्थान घट्ट केले आहे. सत्ताधारी सहकार पॅनलमध्ये राष्ट्रवादीचे ९, काँग्रेसचे ४ तर शिवसेनेचे ३ संचालक असे पक्षीय बलाबल आहे. सत्ताधारी सहकार पॅनलमध्ये राष्ट्रवादीचे ९ संचालक असून, अध्यक्षपदावर त्यांचा दावा आहे.उपाध्यक्षपद काँग्रेसकडे जाणार आहे. या जागेचा उमेदवार ठरविण्याचे अधिकारी डॉ. कदम यांना दिले आहेत. उपाध्यक्षपदी जयश्रीताई मदन पाटील यांची निवड निश्चित मानली जात आहे. अचानक विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, महेंद्र लाड यांचीही नाव उपाध्यक्ष पदासाठी पुढे येऊ शकतात.

टॅग्स :SangliसांगलीbankबँकElectionनिवडणूक