शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील कुंडल, हरिपूरसह पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 12:34 IST

या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे.

सांगली : पलूस तालुक्यातील कुंडल, मिरज तालुक्यातील नांद्रे, हरिपूर, कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव आणि आटपाडी तालुक्यातील चिंचाळे या ग्रामपंचायतीच्या प्रभागाचे आरक्षण सोडत काढताना ओबीसी आरक्षण टाकले नव्हते. म्हणून राज्य निवडणूक आयोगाने ४५२ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमातून पाच ग्रामपंचायती वगळल्या आहेत. तसेच या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे.नांद्रे, हरिपूर, कुंडल, मळणगाव, चिंचाळे या ग्रामपंचायतींचे नव्याने प्रभाग रचनेनुसार आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. पण, अधिकाऱ्यांनी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षण शून्य असल्याने प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम रद्द केलेची जाहीर नोटीस रद्द केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) राजकीय आरक्षण मिळणे गरजेचे आहे, पण असे असूनही हरिपूरकरिता ओबीसी आरक्षण शून्य कसे आले, याबाबत संदिग्धता होती.याविरोधात पाच ग्रामपंचायतींमधील लोकप्रतिनिधींची ओबीसी आरक्षणानुसारच सोडत निघाली पाहिजे. यासाठी राज्य निवडणूक आयोग आणि न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी कुंडल, हरिपूरसह पाचही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. तसेच ओबीसीनुसार निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर केला आहे.आरक्षण सोडतीसाठी विशेष ग्रामसभा दि. १५ नोव्हेंबर रोजी बोलविण्यात येणार आहे. या सभेत प्रारूप प्रभागरचनेवर आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत दि. १७ नोव्हेंबर, दि. १८ नोव्हेंबर सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करणे, दि. १८ ते २२ नोव्हेंबर प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करणे, दि. २३ नोव्हेंबर उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त हरकती विचारात घेऊन अभिप्राय देणे, दि. २४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम प्रभागरचनेला मान्यता देऊन दि. २५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक