शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

दिग्गजांमुळे संखची निवडणूक लक्षवेधी

By admin | Updated: December 26, 2016 22:59 IST

सर्वसाधारण महिलेसाठी खुला : नेत्यांच्या इच्छेवर पाणी; इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी

गजानन पाटील - संख जत तालुक्यातील संख गटात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दिग्गज नेत्यांचा मतदारसंघ असल्याने लढत लक्षवेधी ठरणार आहे. जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण महिलेसाठी खुला झाला आहे. त्यामुळे इच्छुक नेत्यांच्या इच्छेवर पाणी फिरले आहे. भाजप, कॉँग्रेसने मुलाखती घेतल्या आहेत. इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लढती दुरंगी होणार की तिरंगी, याकडे लक्ष लागले आहे.मतदार संघाची प्रथमच पुनर्रचना करण्यात आली आहे. नव्याने गिरगाव पंचायत समिती गणाची निर्मिती झाली आहे. पूर्वीच्या तिकोंडी गणाचा दरीबडची गटात समावेश केला आहे. उमदी, जाडरबोबलाद, दरीबडची या तीन गटांतील आठ गावांचा संखमध्ये समावेश करण्यात आला आहे. संख हा पूर्व भागातील संवेदनशील गट आहे. लोकसंख्या ३१ हजार २६४ आहे. १३ गावांचा समावेश आहे. भाजपचे आमदार विलासराव जगताप, जनसुराज्यचे नेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील, काँग्रेसचे नेते, जिल्हा बॅँकेचे संचालक विक्रम सावंत या नेत्यांचा मतदारसंघ आहे. आ. विलासराव जगताप (१९९१) व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब गडदे (२००२), महिला बालकल्याण माजी सभापती सुजाता पाटील (२००७), माजी जि. प. उपाध्यक्ष बसवराज पाटील (२०१२) यांनी या गटाचे प्रतिनिधीत्व केले आहे.गेल्यावेळी राष्ट्रवादी-जनसुराज्य पक्षाचे बसवराज पाटील, कॉँग्रेसचे विक्रम सावंत यांच्यात चुरशीने लढत झाली होती. त्यात बसवराज पाटील २ हजार १७ मताधिक्याने विजयी झाले होते. मात्र आ. जगताप, बसवराज पाटील हे दोन नेते एका बाजूला असतानासुद्धा तिकोंडी पं. स. गणातून कॉँग्रेसच्या वैजयंती व्हनमाने विजयी झाल्या होत्या. संख पं. स. गणातून राष्ट्रवादीचे आर. के. पाटील विजयी झाले होते.बसवराज पाटील यांना अडीच वर्षे उपाध्यक्षपद मिळाले होते. त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये आ. जगताप यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. पाटील यांनी जिल्हा बँक व सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका कॉँग्रेससोबत लढवल्या. त्यामध्ये बाजार समितीत त्यांच्या गटाचे दयगोंडा बिरादार यांना संधी मिळाली. विधानपरिषद निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे आ. मोहनराव कदम यांना मदत केली आहे. मात्र गेल्या महिन्यात झालेल्या बाजार समिती सभापती, उपसभापती निवडणुकीत जनसुराज्यच्या सदस्यांनी काँग्रेसच्या पतंगराव कदम गटाविरोधात विशाल पाटील गटाशी हातमिळवणी केली होती. त्यामुळे या निवडणुकीत जनसुराज्य पक्षाचे नेते कॉँग्रेससोबत असतील की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. जिल्हा परिषदेसाठी कॉँग्रेसकडून संखचे माजी उपसरपंच श्रीदेवी वज्रशेट्टी, सविता कोट्याळ, भाजपकडून जयश्री पाटील, प्रतिमा बिरादार इच्छुक आहेत. पंचायत समिती गणातून कॉँग्रेसकडून माजी पं. स. सदस्य साहेबराव टोणे यांची स्नुषा निकिता टोणे, आक्काताई टोणे (आसंगी), भाजपकडून काशीबाई टोणे, यशवंत हिप्परकर यांची पत्नी इच्छुक आहेत. गिरगाव गणातून कॉँग्रेसकडून राम दुधाळ (भिवर्गी), राजू पाटील (गिरगाव), श्रीशैल बगली, तर भाजपकडून भिवर्गीचे उपसरपंच आमसिद्ध बिरादार, माणिकनाळचे उपसरपंच अ‍ॅड. आ. सी. घेरडे, गोपाळ कुंभार (गिरगाव), मलकारी पवार इच्छुक आहेत. जिल्हा परिषदेसाठी पांडोझरीच्या आदर्श सरपंच सलिमा मुल्ला अपक्ष म्हणून लढणार आहेत.जनसुराज्यकडून माजी सभापती सुजाता पाटील, सरपंच सुजाता शिळीन, बसवराज पाटील यांची कन्या यापैकी एकीची उमेदवारी असेल.जनसुराज्य-भाजप युतीजनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री विनय कोरे यांची राज्यात भाजपबरोबर युती आहे. तोच फॉर्म्युला तालुक्यात राहणार आहे. त्यामुळे भाजपबरोबर युती होणार, अशी शक्यता आहे. याबाबत बसवराज पाटील काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे. त्यांच्या भूमिकेवरच गटाचा निकाल अवलंबून राहणार आहे.मतदार संघातील संख हे मोठ्या मतदार संख्येचे गाव आहे. उमेदवारी देताना संख गावातीलच उमेदवारी असणार आहे. राष्ट्रवादी निवडणूक स्वतंत्रपणे लढणार, की आघाडी करून लढणार, याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी मुचंडी, संख, उमदीत बैठक घेऊन मते जाणून घेतली आहेत.जनसुराज्य-भाजप यांची आघाडी झाल्यास समीकरणे बदलू शकतात. आघाडी होईल अशी चिन्हे आहेत. नाही झाली तर भाजप, कॉँग्रेस, जनसुराज्यला समान संधी असू शकेल, अशी स्थिती आहे. असा आहे मतदारसंघ...संख जिल्हा परिषद गट - एकूण गावे - १३, संख पंचायत समिती गण - इतर मागास महिला प्रवर्ग- गोंधळेवाडी, संख, आसंगी (जत), तिल्याळ, लमाणतांडा (द.ब)गिरगाव पंचायत समिती गट -इतर मागास प्रवर्ग - बोर्गी बुद्रुक, आक्कळवाडी, लवंगी, माणिकनाळ, मोरबगी, गिरगाव, भिवर्गी, जालिहाळ बुद्रुक