जत : जत तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या ३० गावांसह संपूर्ण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता शुक्रवारपासून लागू करण्यात आली आहे.
२३ ते ३० डिसेंबर २०२० अखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. ३१ डिसेंबर २०२० रोजी छाननी, तर ४ जानेवारी २०२१ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान होऊन १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या ३० गावांसह संपूर्ण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, अशी माहिती प्रांताधिकारी प्रशांत आवटे व तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.
जत तालुक्यात अंकलगी, अंकले, भिवर्गी, धावडवाडी, डोर्ली, घोलेश्वर, गुड्डापूर, जालिहाळ खुर्द, करेवाडी (तिकोंडी), कुडणूर, कुलाळवाडी, लमाणतांडा (उटगी), लमाणतांडा (दरीबडची), मेंढेगिरी, निगडी बुद्रुक, शेगाव, सिद्धनाथ, सिंगनहळ्ळी, सोनलगी, तिकोंडी, टोणेवाडी, उमराणी, उंटवाडी, वळसंग, येळदरी आदी गावांच्या निवडणुका हाेत आहेत.